आठवलेंच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करण्याचा रिपब्लिकन पक्षाच्या शहर कार्यकारिणीचा ठराव
पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडी आणि कामगार आघाडीच्या अध्यक्षांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या शहर कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे, तसेच आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीला डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, एड. आयुब शेख, एड. मंदार जोशी, अशोक शिरोळे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण, सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे, फर्जाना शेख, निलेश आल्हाट, संतोष लांडगे, वसंत बनसोडे, प्रियदर्शनी निकाळजे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, चिंतामण जगताप, लियाकत शेख, बाळासाहेब जगताप, कालिदास गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आठवले यांच्या सूचनेनुसार, शनिवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून, कार्यकर्त्यांना पक्षाच्या भूमिकेची माहिती दिली जाणार आहे.