फ़ॅशन शोमध्ये सूर्यदत्ताच्या विद्यार्थ्यांच्या इनोव्हेटिव्ह कॉस्च्युम डिझाइन्सचे सादरीकरण
पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीतर्फे आयोजित ‘ल क्लासे’ फ़ॅशन शो नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्स आणि मॉडेल्सनी केलेले त्याचे मनमोहक सादरीकरण यामुळे ‘ल क्लासे’ फ़ॅशन शोने उपस्थितांची मने जिंकली. फॅशन शोचे हे आठवे वर्ष होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण व्हावे, या उद्देशाने हा फॅशन शो आयोजिला जातो. यावेळी अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोषाखांचे डिझाईन्स कौतुकास्पद असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून आयोजिला जाणारा हा फ़ॅशन शो विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट डिझाईनर शोधण्यासाठी उपयुक्त आहे. व्यावसायिक स्वरुपाच्या फॅशन शोप्रमाणे त्याचे आयोजन केले होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या डिझाईन्स परिधान करुन अनेक प्रसिद्ध मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला. यंदा विद्यार्थ्यांनी ‘न्यू स्टाईल इनोव्हेशन’ या संकल्पनेवर काम केले होते. द रेज ऑफ रॅफल्स, ड्रॅमॅटिक डिझास्टर, मिस्ट्रीयस क्रिएशन्स, द आफ्रिकन वार्डरोब, द इरा ऑफ १९४५, ग्लोरी गर्ल्स, ऍक्वाटिक ड्रीम्स, द डेनिम हँगओव्हर, बंजारा- द वन्डरिंग सोल्स या नऊ संकल्पनांवर हे सादरीकरण झाले.
संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या शोवेळी अभिनेत्री दिगंगना सुर्यवंशी, बँकर सुरी शांडिलिया, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रमुख आणि फ़ॅशन शोच्या समन्वयिका प्रा. रेणुका घोसपूरकर आदी उपस्थित होते. फ़ॅशन डिझाईनर संदेश नवलाखा, शलाका घैसास आणि गीता कस्तुरी यांनी ज्युरी म्हणून काम पहिले. ‘ड्रॅमॅटिक डिझास्टर’ला प्रथम क्रमांकाचे, तर ‘डेंनीम हँगओव्हर’ला द्वितीय क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले.
द रेज ऑफ रॅफल्समध्ये प्राजक्ता शिंदे, बरखा सिंग, अखिशा विभुते, ड्रॅमॅटिक डिझास्टरमध्ये प्रियांका मंत्री व निकिता सातव, मिस्ट्रीयस क्रिएशन्समध्ये मित्तल बारवाडिया, निकिता वोरा, निकिता साळुंके, प्रतीक्षा पाटील, संतोष शहा, लावीना अनवाडिया, द आफ्रिकन वार्डरोबमध्ये राही मोहिते, श्रुती अगरवाल, मयुरी टेकाळे, द इरा ऑफ १९४५ मध्ये कीर्ती भोपे, सिमरन चंकेश्वरा, कोमल घोडके, ग्लोरी गर्ल्समध्ये दीक्षिता बोकाडिया, तृप्ती वलसलवार, सुकन्या म्हात्रे, ऍक्वाटिक ड्रीम्समध्ये रुपाली भोगल, देवश्री वलसलवार, सोनाली कराड, द डेनिम हँगओव्हरमध्ये अपूर्वा दोषी, स्नेहा नायर, रेणुका नेटके, बंजारा- द वन्डरिंग सोल्समध्ये प्रतीक्षा गवळी, सदिच्छा राऊत,स्वप्नाली देशपांडे यांनी कास्च्युमचे डिझाइन्स केले होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी जे शिकतात, अनुभवतात, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून त्यांना प्रोत्साहित करावे, हा या फ़ॅशन शोच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आभूषणांच्या, कपड्यांच्या डिझाइन्सचे दर्शन व्यावसायिक मॉडेल्स घडवितात. यातून डिझाईनर्सना अनेक संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
प्रा. घोसपुरकर म्हणाल्या, “आदिवासी, आफ्रिकन आणि बंजारा संस्कृतीवर विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. त्यासाठी डेनिम, कॅनकॅन फॅब्रिक, खण फॅब्रिक अशा प्रकारांचा यात वापर केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फ़ॅशन क्षेत्रात होत असलेले बदल आणि ट्रेंड्सही या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजतात.” नुपूर पिट्टी यांनी फ़ॅशन शोचे निवेदन केले.