पुण्यातील सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड (वखार महामंडळपर्यंत) सुमारे 650 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेविका कविता भरत वैरागे,अमोल बालवडकर ,प्रवीण चोरबोले आदी उपस्थित होते.
..गिरीश बापटांचे पुन्हा फनी विधान आणि भविष्याबद्दल ‘चिंता राग ‘(व्हिडीओ)
पुणे- ‘बिगर लग्नाचा आहे मग भाजप मध्ये ये .. पण नंतर लग्न एकच करायचे ‘ अशा प्रकारचे फनी विधान आज आपल्या भाषणातील सुरुवातीलाच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे . तर भाषणाच्या शेवटी मात्र त्यांनी पुन्हा आपला ‘चिंता राग ‘ आळवला आहे , राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही , १ वर्ष तरी मी अजून सत्तेत आहे , तोवर काम पूर्ण करून मलाच बोलवा उद्घाटनाला .. अशा स्वरूपाचा चिंताराग त्यांनी पुन्हा आवळला आहे .
बापट बोलत असताना एक तरुण फोनवर बोलत होता. यावेळी त्या तरुणाला उद्देशून ते म्हणाले ” होऊ दे भाऊ, तुझा फोन होऊ दे..बायकोशी घे बोलून तेवढं! बिगर लग्नाचा असशील तर मग भाजपमध्ये ये, तुला रोजगार देतो, नोकरी देतो, फक्त एकच लग्न कर, असा सल्लाही त्याला दिला.
दरम्यान, अशा प्रकारची विधाने करण्याची गिरीश बापटांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना ‘तसल्या क्लिपा आम्ही पण पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे देठ हिरवे आहे’ असे वक्तव्य करत वाद ओढवून घेतला होता. तर शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पुणे शहरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ‘चल म्हटली की लगेच चालली,’ असे वक्तव्य केले होते.