आमीन कहने से पहले ही आपकी हर दुआ कबूल हो जाए।।
अमामा पहनके संजय काकडेंंच्या मुबारकबादने मुस्लीम समाजाचे वेधले लक्ष
पुणे-
तमन्ना आपकी सब पूरी हो जाए,
हो आपका मुकद्दर इतना रोशन की,
आमीन कहने से पहले ही आपकी हर दुआ कबूल हो जाए।।
आमीन कहने से पहले ही आपकी हर दुआ कबूल हो जाए।।
डोक्यावर सफेद ‘अमामा’ म्हणजे मुस्लीम समाज प्रार्थनेच्या समयी डोक्यावर परिधान करतो ती कॉटनची सफेद टोपी घालून खासदार संजय काकडे यांनी दिलेली मुबारकबाद आणि शुभेछ्यां आज पुण्यातील ईदगाह मैदानावर अनेकांचे लक्ष वेधून गेली .
त्याला कारणही तसेच झाले भाजपचे आणि अन्य पक्षीय देखील अनेक नेत्यांनी ,राजकीय पुढाऱ्यांनी ईद निमित्त मुस्लीम समाजला मुबारकबाद देण्यासाठी नेहमीप्रमाणे येथे गर्दी केली होती .पण यातूनही आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात काकडे यांनीच यश मिळविले . पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार जयदेव गायकवाड, ईदगाह मैदानाचे विश्वस्त जयलूल काझी, माजी नगरसेवक आयुब शेख, नगरसेविका मनीषा लडकत, नगरसेवक तुषार पाटील, महेश लडकत, नाना भानगिरे ,प्रकाश कदम ,इक्बालभाई अन्सारी, इशाक जाफर, इशाक चाबीवाला, मुश्ताक पटेल, झाकीर कुरेशी, रफिक हबीब शेख आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते .
पहा हे फोटो …
या सर्वांनी गुलाब पुष्प देवून मुबारकबाद दिली . पण सर्वांच्या माथ्यावर ‘अमामा’ नव्हता केवळ काकडे यांच्या माथ्यावर कॉटन चा सफेद अमामा दिसत होता .ज्याने चिकित्सक आणि विचारवंत म्हणविल्या जाणाऱ्या मुस्लीम समाजातील अनेकांनी चर्चेतून हा मुद्दा नोंदविला .
दरम्यान महापालिकेतील सभागृहनेते भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आज मुस्लीम समाजाच्या विविध कार्यकर्त्यांच्या आणि परिचितांच्या घरी किंवा दुकानी जावून मुबारक बाद दिली .
पहा हे फोटो …