पुणे-“विवाहाच्या शुभ मुहूर्तावर नवं दाम्पत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 4 मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेऊन व विवाहातील उपस्थित लोकांना 1000 वृक्ष सप्रेमभेट देऊन आपल्या सहजीवनाची आगळी वेगळी सुरुवात केली.
दौंड तालुक्यातील मौजे हिंगणिगाडा येथील बाळासाहेब खराडे यांची मुलगी व वरिष्ठ न्यायाधीश उमेशचंद्र मोरे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांची मेव्हूनी सुषमा ही विधी पदवीधरअसून पुणे येथे इन्फोसिस मध्ये विधी विभागात काम करते.चि.अमित लक्ष्मण मोहिते हा मौजे तळबीड तालुका कराड येथील असून बजाज ऑटो पुणे येथे डिझाइन इंजिनिर म्हणून कार्यरत आहे.या नवं दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी ची नाळ तुटू नये म्हणून व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्या विवाह खर्चात बचत करून निरंजन सेवाभावी ट्रस्ट ही आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुके शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेते.या संस्थेला 4 मुलांना शैक्षणिक दृष्टीने दत्तक घेतले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी आमदार रमेशअप्पा थोरात यांचे हस्ते निरंजन चे कार्याध्यक्ष विराज तावरे यांचे कडे आर्थिक मदतीचा चेक सुपूर्द केला.तसेच दिवसेंदिवस बेसुमार वृक्षतोड व नागरीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास वाचवण्यासाठी’ झाडे लावा झाडे जगवा”हा संकल्प सुद्धा नवं दाम्पत्याने विवाह सोहळ्यात हाती घेतला व प्रत्येक उपस्थितांना वृक्ष भेट दिला जेणेकरुन पर्यावरणाचा संतुलन राखण्यास मदत होईल.
संत तुकाराममहाराजांच्या ‘ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे |पक्षी सुस्वरे|आळविती|| येणे सुख रुचे पळीताचा वास|नाही गुणदोष|’ या अभंगाचा बोर्ड विवाह स्थळी लावून 1000 वृक्ष नवं दाम्पत्याने सप्रेम भेट दिले. या नवंदाम्पत्यास शुभ आशीर्वाद देण्यास माजी आमदार रमेश अप्पा थोरात ,माजी आमदार श्रीमती रंजनताई कुल,श्री राजसिंह मोहिते पाटील (चेअरमन शिवामृत दूध संघ) शिव व्याख्याते श्रीमंत कोकाटे,योग गुरू दत्ताजी कोहिणकर, विकास अण्णा पासलकर,पुणे महानगरपालिका सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक,उद्योजक राजू थोरात,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादीकाँग्रेसचे लीगल सेल चे अध्यक्ष भगवानराव साळुंखे , उद्योजक फाळके ,महाराष्ट्र बार काँसिल चे शिस्त पालन समिती सदस्य तुषार कोठावळे,पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर,दैनिक सकाळ चे मुख्य कार्यकारीअधिकारीमहेंद्र पिसाळ, ऍड प्रशांत गिरमकर,शिवराज जहागीरदार,विराज तावरे ,शिवाजीराव निगडे ,देशमुख हरी प्रकाश निगडे देशमुख उपस्थित होते.