पुणे :- पुणे शहरातील घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल तसेच लुल्लानगर चौक उड्डाणपूलाचे काम लवकरच मार्गी लागेल असा विश्वास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला.
या दोन्ही उड्डाणपूलाच्या कामासंदर्भात आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री श्री. कांबळे यांनी आज पुणे येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली होती. त्यानंतर ते बोलत होते.
उड्डाणपुलाच्या परिसरातील अतिक्रमण लवकरात लवकर काढावे तसेच भूसंपादनाच्या कार्यवाहीमध्ये पुणे महानगरपालिकेने समन्वयाची भूमिका पार पाडावी असे निदेशही श्री कांबळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.