पुणे – आक्रोश या विनोदी दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, संपादक तात्यासाहेब उर्फ ज्ञानेश्वर जराड, विलास कसबे, आबासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, संतोष मोरे आदी उपस्थित होते. आक्रोश दिवाळी अंकाला यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या अंकामध्ये विनोदी कथा,विशेष लेख, वात्रटिका, कविता, हास्यचित्रे यांचा समावेश आहे. गेल्या 48 वर्षांपासून नियमितपणे विनोदाद्वारे वाचकांची सेवा करत असलेल्या आक्रोश दिवाळी अंकात अनेक मान्यवर व्यंगचित्रकार,लेखकांनी हजेरी लावलेली आहे.