पुणे : शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी हुतात्मा भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.