कुर्डुवाडी– पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र तर्फे उच्चशिक्षित सचिन नवनाथ घुगे (BE.MECH.) आणि सृष्टी अशोक राऊत (M.COM.) यांचा रविवार दि.31 मार्च 2019 रोजी कुर्डुवाडी येथील कुबेर मंगल कार्यालयात दु.12.30वा. नवदाम्पत्यांचे शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळ्यांना पुष्प हार अर्पण करून महात्मा फुले साहित्य प्रकाशन समिती ,महाराष्ट्र शासन चे सदस्य रघुनाथ ढोक यांनी थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीने सत्यशोधक विवाह रजिस्टरमध्ये नोंदणी करून महात्मा फुले यांचे वेशभुषेत लावला.या वेळी मान्यवरांचे शुभहस्ते नवदाम्पत्यांना सत्यसोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी भेट दिली.
याप्रसंगी काशीनाथ तळेकर (पोलिस उप आधिक्षक),रामचंद्र घुगे (पोलिस निरीक्षक )
सुहास शहा (पश्चिम महाराष्ट्र उप अध्यक्ष,भाजपा उद्योग आघाडी),धनराज दादा शिंदे (अध्यक्ष माढा वेलफेयर फाउंडेशन) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी रघुनाथ ढोक म्हणाले की या उच्चशिक्षित वधु वर पालकांनी योग्य निर्णय घेऊन अनिष्ठ प्रथांना फाठा देत कोणताही मुहर्थ,पत्रिका न पाहता सुट्टीचा दिवस सोयची वेळ पाहून हा पहिला कुर्डूवाडीतील विवाह सर्व समाजाला दिशा देणारा ठरला त्याबद्दल अभिनदन केले .तसेच या पुढे असे सामुदायीक सत्यसोधक विवाह लावनेसाठी इतरांना प्रेरीत करा म्हणजे खर्या अर्थाने महात्मा फुले ,छत्रपती शाहू महाराज ,डॉ आंबेडकर यांचे विचार सर्व स्थरात पोचेल व नाहक होणारा खर्च वाचेल असे सांगितले . पुढे असे देखील ढोक म्हणाले की आमचे संस्थेने पुणे येथे १९ मे २०१९ रोजी मोफत सत्यसोधक विवाह सोहळा आयोजित केला आहे.तरी आपण सर्व जाती धर्माचे बांधवाना ही माहिती द्यावी .
यावेळी महात्मा फुले रचित मंगलाष्टकं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष दत्तात्रय घाडगे ,सांगली यांनी म्हंटले तर वधु वर यांना बारामती चे शारदानगर सायन्स कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजाराम ढोक यांनी योग्य वैवाहिक जीवनाचे सूत्रे सांगून नऊ प्रतिज्ञा असलेली शपथ वदवून घेऊन जीवनसाथी म्हणून संसार करताना दीनदुबळ्या ची सेवा करा असे म्हणाले .
या विवाहातील नासाडी होणारे अक्षताचे तादूळ अधिक तांदूळ एकत्र करून कुर्डूवाडीतील एडस ग्रस्थ उमीद संस्थेला नवदाम्पत्यांचे शुभहस्ते पूजेचे दिवशी वराचे बंधू सामाजिक कार्यकर्ते गणेश घुगे यांनी देणार असलेचे सांगून सर्वांचे आभार मानले.या वेळी मोठ्या संख्येने हा सत्यसोधक विवाह पाहणेसाठी सर्व जाती धर्माचे समाज बांधव उपस्थित होते.
हा विवाह यशस्वी करण्यासाठी संत जनाबाई सावता माळी देवस्थान ट्रस्ट ,भेंड आणि युवा सामाजिक संस्था, कुर्डुवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले.