पुणे- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन आणि अखिल भारतीय महात्मा फुले समतापरिषद तर्फे महात्मा फुले यांचे 128 वी पुण्यतिथी आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे72 व्या वाढदिवसानिमित्त हरियाणा, कुरुक्षेत्र येथील सैनी समाज भवन च्या सावित्रीबाई-ज्योतिबा फुलेग्रंथालयास सामाजिक क्रांतीचे जनक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि सत्यशोधक ज्ञानज्योतीसावित्रीबाई फुले 3फुटी अर्ध पुतळे अध्यक्ष गुरणांम सिंग सैनी यांचेकडे भेट दिले.या वेळी सैनी यांना महात्माफुले पगडी,उपरणे आणि कुरुक्षेत्र विद्यापीठाचे डॉ.सुभाष सैनी आणि जेष्ठ समाजसेविका उषा पांढरे यांचेशुभहस्ते महापुरुषांचे 72 ग्रंथ नुकतेच भेट दिले.यावेळी माजी अध्यक्ष व माजी खासदार गुरुदयाल सिंग,माजीअध्यक्ष बलजीत सैनी,सचिव कौशल सैनी,सैनी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष मायाराम सैनी,शिवदास महाजनआणि महात्मा फुले यांचे वेशभूषेत रतन माळी, रघुनाथ ढोक व सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषेत आशा ढोकप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना गुरणांम सिंग सैनी म्हणाले की हे पुतळे भेट देऊन महाराष्ट्र आणि हरियाणायांचे सबंध दृढ तर झालेच त्याबरोबर फुले दाम्पत्याचे महान कार्याची ओळख देखील झाली.त्यांचे सामाजिककार्याची ज्योत या निमित्ताने या परिसरात पेटत राहील त्यामुळे समाजातील सर्व घटक एकत्र येऊन शेवटच्याघटकापर्यंत आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करु. या पुतळ्याचे सोबत फुले पगडीचा ताज आमचे डोक्यावरदिल्याने आमची सामाजिक जबाबदारी वाढली आहे असे देखील त्यांनी म्हंटले.
याप्रसंगी आयोजक फुले एज्युकेशनल चे रघुनाथ ढोक यांनी पुतळे देण्यामागची भूमिका ,संस्थेचे कार्य तसेचमहात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले कार्याची गरज आज पण आहे असे म्हंटले.शिवदास महाजन ,रतन माळीआणि डॉ.सुभाष सैनी यांनी देखील फुले दाम्पत्याच्या कार्याचा वसा आपण सर्वांनी पुढे नेऊन सर्व वंचित घटकाचीसेवा करावी असे मौलिक विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर आभार कौशल सैनी यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीराष्ट्रीय ओबीसी महासंघ,प्रतिमा परदेशी,दिलीप शेलवंते ,मंजिरी धाडगे,सुनीता भगत,वृषाली शिंदे,राजेंद्रआल्हाट,कै. बाबुराव धायरकर,राखी रासकर,रोहिणी भुजबळ,सुदाम धाडगे,किशोर भास्कर,शांतारामक्षीरसागर,पोपट सातव,शिवगोविंद कुशवाह,कैलास काठे,बाळासाहेब रायकर, बाळ भाकरे , ढोक परिवार तसेचसैनी समाज भवन चे विश्वस्त ,कर्मचारी यांनी मोलाची मदत केली. हरियाणा परिसरात फुले दाम्पत्याचे पुतळेप्रथम देण्याचा मान पुणे शहराला मिळाला याचा सर्वाना आनंद होऊन रॅली काडून ते फुले दाम्पत्य पुतळेग्रंथालयात ठेवले या वेळी मोट्या संख्येने सैनी समाज उपस्थित होते.