प्रा. लुईस डार्टनेल यांनी साधला गोयलगंगा स्कूलच्या विद्यार्थ्याशी संवाद
पुणे : “ पृथ्वी हा ग्रह या अफाट विश्वात छोट्याशा बिंदूएवढा. फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे, असं मानणे संयुक्तिक ठरणार नाही. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, परग्रहावर नक्कीच जीवसृष्टी असायला हवी. ती सूक्ष्म जंतू किंवा साध्या प्राण्याच्या स्वरुपात असू शकेल” अशी माहिती देणाऱ्या प्रा. लूईस यांचे व्याख्यान तल्लीनतेने ऐकतानागोयलगंगा इंटरनैशनल स्कूलचे विद्यार्थी खगोलशास्त्र विश्वात रमून गेले.
वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील प्राध्यापक लुईस डार्टनेल यांनी खगोलजीवशास्त्र (ॲस्ट्रोबायोलॉजी) आणि मंगळावरील सूक्ष्मजीव यांचे जीवन याविषयांवर संशोधन केले आहे. लुईस शाळांमध्ये आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये खगोल जीवशास्त्राविषयी विद्यार्थांना मार्गदर्शन करत असतात. याच उपक्रमांतर्गत त्यांनी गोयलगंगा इंटरनैशनल स्कूल भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी लुईस यांनी ‘जीवन’ या शब्दाचा खरा अर्थ काय? इतर ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्त्वात आहे का? या विषयी शास्त्रज्ञांकडून झालेली संशोधने इतर ग्रहांवर जीवनाच्या संभाव्य अस्तित्वाबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. ते स्वत: ज्या प्रकल्पाचा भाग म्हणून काम करत आहेत अशा ‘एक्सोमार्स २०२०’ या प्रोजेक्टची देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच परग्रहावर सापडल्या जाणाऱ्या प्रजाती यांच्याविषयी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.
प्रो. डार्टनेल यांनी वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे. असंख्य माहितीपट आणि रेडीओ कार्यक्रमांमध्ये देखील काम केले असले तरी विद्यार्थ्यांशी त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या संवादाने प्रभावित झालेल्या विद्यार्थांनी व्याख्यानाचे सत्र संपन्न झाल्यावर जिज्ञासू वृत्तीतून त्याच्याभोवती घेरा घातला. प्रश्न उत्तरांने याची सांगाता झाली.