यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तो निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यात आवश्यक त्याठिकाणी घटही केली पाहिजे . आमच्या काही इतर मागण्या आहेत त्यापुढीलप्रमाणे प्रकल्प मूल्यांकन निर्णय पद्धत चालू करणे , पार्किंगच्या मूल्यमापनमधील विसंगती दूर करणे , रेडी रेकनर निश्चित करण्यासाठी सूक्ष्म नियोजन प्रक्रिया अवलंबिणे, ३ ते ५ वर्षांत एकदा रेडीरेकनरचे प्रकाशन, तळ टीपांमध्ये दुरुस्त्या, मूल्यांकन मूल्य कराराचे निराकरण यागोष्टी प्राधान्याने सरकारने करणे आवश्यक आहे त्याचवेळी गेल्या ५ वर्षात स्टॅम्प ड्युटी ४० टक्क्यांनी वाढवण्यात आलीये त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
शांतीलाल कटारिया (उपाध्यक्ष, क्रेडाई नैशनल)