पुणे :- दैनंदिन आयुष्य जगत असताना विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञान उपयोगी पडत असते. प्रात्यक्षिक ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जगाची माहिती अधिक मिळते आणि हीच माहिती त्यांना जीवन जगण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना देणे अधिक आवश्यक आहे. शाळेत मिळालेल्या या ज्ञानाच्या आधारे ते नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यातून समाजात नवे परिवर्तन घडवून आणू शकतील. शिक्षणाची गंगोत्री गावोगाव पोहचवून देशाच्या विकासात आम्हीही खारीचा वाटा उचलू असे ही ते यावेळी म्हणाले. अशी भावना बजाज ऑटोच्या सीएसआर विभागाचे सल्लागार सी. पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केली.
पुणे राऊंड टेबल १५ ,बजाज ऑटो आणि साने गुरुजी शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने
वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुणे राऊंड टेबल १५ चे अध्यक्ष देवेश जतिया, विरोधी पक्षनेते व साने गुरुजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष चेतन तुपे, राऊंड टेबल इंडिया राष्ट्रीय खजिनदार अक्षय दुगर , राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक मोर्य फिलीप , सरपंच,मुख्याध्यापक व समस्त शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.
वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या ७ वर्गांचे नूतनीकरण आणि ४ नवीन वर्ग तयार करण्यात आले असल्यामुळे याचा फायदा २०० हुन अधिक मुलांना होणार आहे.
प्रत्येक मुलाला शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे त्यामुळेच आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या या पिढीला ते मिळवून देणे आमचे कर्तव्य आहे. आमच्या राऊंड टेबल इंडियच्या ( “शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य”( “Freedom Through Education या संकल्पनेअंतर्गत ज्या शाळांना पायाभूत सुविधा,ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, पुस्तके, स्टेशनरी असे जे काही आवश्यक आहे ते देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यामुळे जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येणे शक्य होईल. असे देवेश जातिया म्हणाले .
ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे आमच्या संस्थेचे उदिष्ठ आहे. या माध्यमातून या मुलांना आधुनिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करत आहोत असे मनोगत चेतन तुपे यांनी मांडले.