पुणे-कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे झेंडे, तरुणांच्या दमदार घोषणा फटाक्यांचा धडाका आणि राष्ट्र भक्तीची गीते अशा वातावरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचंड मोठ्या प्रचार रली ची सुरवात आज चंदन नगर येथून झाली. प्रारंभी चंदन नगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून या प्रचार रलीस सुरवात झाली. यावेळी अजित पवार हर्षवर्धन पाटील मोहन जोशी यांसह कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष चेतन तुपे , आमदार शरद रणपिसे , माजी आमदार बापूसाहेब पठारे, यांसह सर्व आजी माजी नगरसेवक , पदाधिकारी , व कार्यकर्ते उपस्थित होते. जीप मध्ये अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि मोहन जोशी व त्यांच्या पुढे मागे झेंडे घेतलेले हजारो मोटर सायकल वरील युवक अशी हि प्रचार रली नागरिकांच्या कुतूहलाचा विषय बनली होती. या रलीचे व्यापारी, गणेश मंडळ कार्यकर्ते व नागरिक जल्लोषात स्वागत करत होते. अनेक ठिकाणी थंड पेय व पाणी देऊन स्वागत होत होते. शिवदर्शन चौकात गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला गेला संपूर्ण शहरात फिरलेल्या या प्रचार रलीत ठीकठीकांचे कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत होते.
हि प्रचार रली चंदन नगर वरून पाण्याची टाकी – वडगावशेरी – गणेश अंगार – आनंद पार्क – भाजी मंडई – सोमनाथ नगर – नगर रोड – एअरपोर्ट रोड – रामवाडी – शास्त्री नगर चौक – हौसिंग बोर्ड – नागपूर चाळ – विश्रांतवाडी – फुले
नगर – मेंटल कॉर्नर – राम सोसायटी – आंबेडकर नगर – चांदणी चौक – शादलबाबा चौक – येरवडा – पर्णकुटी चौक – नारंगी बाग – ताडीवाला रोड – पंचशील चौक – रमाई कमान – पुणे स्टेशन – जिल्हा परिषद चौक – नरपतगिरी चौक– कमला नेहरू हॉस्पिटल – साततोटी चौक – पवळे चौक – सूर्य हॉस्पिटल – शनिवारवाडा – लाल महल – शिवाजी रोड– दत्त मंदिर – रामेश्वर चौक – मामलेदार कचेरी – स्वारगेट चौक – लक्ष्मिनारायण चौक – पुष्प मंगल कार्यालय –बिबवेवाडी रोड – शनी मंदिर चौक – के के मार्केट चौक – तीन हत्ती चौक – सुभाष जगताप निवास – गजानन महाराजचौक – शिवदर्शन चौक – मित्र मंडळ चौक – महालक्ष्मी मंदिर चौक – दांडेकर पुल – दत्तवाडी – म्हात्रे ब्रीज – निंबाळकरबाग – करिष्मा सोसायटी – सुतार निवास – पौड रोड – पौड फाटा – एस. एन. डी. टी. रोड – बारामती होस्टेल –शहीद तुकाराम ओम्बाळे चौक – जनवाडी – दत्ता बहिरट ऑफिस – कुसाळकर पुतळा – दीपबंगला चौक – वडारवाडी मार्ग – ज्ञानेश्वर पादुका चौक – पोलीस लाईन – जंगली महाराज रोड – संभाजी पुतळा – फर्ग्युसन कॉलेज रोड – अॅग्रीकल्चर कॉलेज – पुणे विद्यापीठ येथे समाप्त झाली.