राहुल:प्रियांका गांधींसह दिग्गजांच्या सभांसाठी शहर कॉंग्रेस सज्ज – रमेश बागवे
पुणे-कॉंग्रेसचा उमेदवार कोणीही देवू द्यात , आम्ही मोदी सरकारची फसवेगिरी या सरकारचे भांडे फोडण्याचे काम सातत्याने रस्त्यावर येवून केले आहे. आता घरो घरी पोहोचणार आहोत ,प्रचारासाठी आम्ही सज्ज झालो आहे.पक्षाचे दिग्गज नेते सोनिया गांधी,राहुल गांधी ,प्रियांका गांधी आणि बड्या नेत्यांच्या सभा पुण्यात व्हाव्यात ,प्रचार फेऱ्या ,दौरे पुण्यात व्हावेत यासाठी आम्ही सज्ज आहोत.प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत अशी माहिती येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे दिली .
ते म्हणाले ,’स्वतः चव्हाण नांदेड मधून उमेदवार असल्याने पुण्याचे कार्यकर्ते नांदेड मध्ये जावून येतील आणि चव्हाण हे देखील पुण्यात सभा जरूर घेतील . त्यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण ,हर्षवर्धन पाटील ,वसंतराव पुरके आणि केंद्रातील राज्यातील दिग्गज नेते यांच्या सभांसाठी ,दौऱ्यांसाठी आम्ही जय्यत तयारी करत आहोत . पक्षाने उमेदवाराचे नाव घोषित करताच उमेदवारी अर्ज दाखल करू,बूथ कमिट्या आमच्या तयारीत आहेत . कार्यकर्ते तयारीत आहेत .काही सिलेब्रीटी प्रचाराला येतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात विधान सभेसाठी इच्छुक असणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे हे कार्यकर्ते कामाला लागले आहेत .पुण्याची भाजपने कशी वाट लावली, देशाची कशी फसवणूक केली याचा पुन्हा पुन्हा पाढा जनतेपुढे वाचण्याचे काम हा कॉंग्रेसचा कार्यकर्ता करेल .या साठी युवक ,महिला वर्ग यांच्या प्रचार फेऱ्यांचे नियोजन देखील अंतिम टप्प्यात आहे असेही बागवे यांनी सांगितले.