पुणे- पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सामान्य पुणेकरांच्या मनात दहशत पसरविण्याचे कृत्य चालविले असून कायद्याच्या नावाखाली शहरात अवैध धंदे वाढत असताना त्यंच्यावर कारवाई करण्याचे सोडून हेल्मेट सक्ती च्या नावाखाली पुणेकरांची लुट सुरु ठेवली आहे .या विरोधात आंदोलने करणाऱ्या विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी गुन्हे दाखल करणे, त्यांना आंदोलनाला परवानगी न देणे एवढेच काय तर त्यांचे अर्ज देखील न स्वीकारणे अशा पद्धतीने आंदोलकांना दुर्लक्षित वागणूक एकीकडे द्यायची आणि दुसरीकडे काही माध्यमे हाताशी धरून पुणेकरांवर जोरदार कारवाई सुरु ठेवायची असे धोरण राबविताना दिसत आहेत . या पार्श्वभूमीवर आपला दाबला जाणारा आवाज आता उठवायचा कसा ? या प्रश्नाने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना भेडसावले जात असताना अखेरीस त्यांना शिवसेनेच्या महादेव बाबर यांनी वैकुंठ स्मशानभूमीत हेल्मेटचा दहावा असे आंदोलन केले त्यात कृती समितीचे सर्व कार्यकर्ते नेते सहभागी झाले .यावेळी मायमराठी शी बोलताना या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांच्याबद्दल संताप व्यक्त केला ..आयुक्त ,उपायुक्त आणि आंदोलक यांच्यात जणू आता वानवा पेटणार याची चिन्हे यावेळी जाणवली ….पहा यावेळी नेमके हेल्मेट विरोधी कृती समितीचे अंकुश काकडे आणि संदीप खर्डेकर यांनी काय म्हटले आहे ….