चाटे शिक्षण समूह पुणे विभागाचे वतीने शैक्षणिक मार्गदर्शन
ध्येयाने वेडे होऊन अभ्यास करा- प्रा चाटे
पुणे-
वाढत्या जीवघेन्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला काय व्हायचे आहे हे ठरवा व तशी वाटचाल करा. पुढचा टप्प्यावर तुम्हाला काय करायचय याची अंतिम क्षणापर्यंत पाहु नका, दहावीची बोर्ड परीक्षा तुमच्या करियरची सुरवात आसते. त्याचा कोणताही दबाव अथवा प्रेशर घेऊ नका. वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करा, पेपर लिहीत असताना देखील कॉन्फिडन्स असला पाहिजे.स्पर्धा परीक्षा देश पातळीवरची 17 लाख विद्यार्थ्याबरोबर असल्याने तयारी तेवढी चांगली असेल तर रिझल्ट तसाच मिळेल.सखोल ज्ञानाने शन्यातून विश्व निर्माण होते. वारंवार अभ्यासक्रम बदली होत असल्याने वेळ खडतर आहे, त्यासाठी आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्याची मानसिकता बदलणे गरजेचा असून मुलांना जबाबदारी ची जाणीव करून द्या. विद्यार्थ्यांनी देखील पालकांच्या स्वप्नाचा चकनाचूर करू नका, त्याची मान अभिमानाने उंच होईल असे करा, दशा बदलण्यासाठी दिशा बदला. करिअर घडवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, प्लानिंग कराच त्याच बरोबर सोशल मीडिया आणि मोबाईल व टीव्हीच्या पासून दूर रहा. पुढील अभ्यासावर परिणाम होत असल्याने झालेल्याची निरर्थक चर्चा करू नका. पूर्वी पासून ध्येय व करिअर ठरवून उत्तुंग यशाचा पाठलाग करण्याचे आवाहन चाटे शिक्षण समूहाचे सचालक प्रा फुलचंद चाटे यांनी केले.
ते काल यश लॉन्स येथील दहावी बोर्ड परीक्षा व स्पर्धा परिक्षा करियर मार्गदर्शन शिबीरामध्ये बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंदजी चाटे, प्रा विजय बोबडे, प्रा भारत खराटे, प्रा. रमेश बनकर प्रा.बापूसाहेब काटकर, प्राचार्य समर जामदार, यांच्यासह हजारोच्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण घेत असलेला सौरभ निंबाळकर तसेच आय आय टी क्षेत्रात पी एच डी करणारा मंगेश शेंडकर व विद्यार्थीनी आदिती शेवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा शुभारंभ गायत्री कुलकर्णीच्या गणेश वंदनेने करण्यात आली.
प्रा गोपीचंद चाटे यांनी अध्यक्षीय भाषणात खुमासदार शैलीत विद्यार्थी व पालकांना अवाहन करताना यशाच्या शिखरावर जाण्यासाठी सर्व वेळ चागला असतो, विद्यार्थ्याणी दबावाखाली नको मात्र आस्था व कष्ठाशिवाय पर्याय नाही. शॉर्टकटचे यश ज्यास्तवेळ टिकत नाही. मार्ग काटेदार आहे, विद्यार्थ्यांना बंधनात राहायला आवडत नसल्याने त्यांना नजरेच्या आवाक्यात ठेवत त्यांच्या सोबत संवाद घडवा, टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम ओळखून बिघडण्या इतपत अडकू नका, जगण्यासाठी जेवढी धडपड करता तेवढी यश मिळवण्यासाठी करावेत. चाटे शिक्षण समूहाची ख्याती पाया मजबूत करून उच्च पदापर्यंत पोहचवण्याची असल्याने हजारो संख्येने विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर व वरिष्ठ पातळीवर आहेत. दहावीची परीक्षा केवळ अभ्यास नसून करियरसाठी आहे व ही संधी सर्वांसाठी उपलब्ध असून तुमच्यातील उर्जेला योग्य दिशा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समर जामदार यांनी केले.
तसेच 30 डिसेंबर रोजी एन्टरन्स टेस्ट घेतली त्याचा 6 जानेवारी रोजी निकाल लागला, या परीक्षेतील दहावीची परीक्षा, अभ्यासाच्या वेळेचे गमक, पेपर सोडवताना ध्यान द्यायच्या बाबी व उत्तर पत्रिका सोडवण्याचे गमक याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सातारा रस्ता विभागाकडील विद्यार्थ्यांना मार्केट यार्ड येथील उत्सव हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये तर वारजे भागातील विद्यार्थ्यांना वारजे येथे पार पडले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.