मार्केटयार्ड , मुकुंद नगर परिसरात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा प्रचार
पुणे- शहराच्या संमिश्र अशा मार्केटयार्ड , मुकुंद नगर परिसरात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी सोमवारी सकाळी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला . आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेकाना कामावर जाण्याची गडबड होती तरी पण नागरिकांनी श्री बापट याना शुभेच्छा दिल्या.
रणरणत्या कडक उन्हाचा चटका बसत असतानाहि कार्यकर्त्याचा उत्साह कमी झाला नव्हता. वाजत– गाजत आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीचा सारा परिसर दुमदुमून सोडला. मुकुंद नगरमधील सुजय गार्डन पासून सुरु झालेली प्रचारफेरी डायस प्लॉट , सॉलिसबरी पार्क, महर्षीनगर, मार्केटयार्ड , मार्गे गंगाधाम चौक येथे समारोप झाला. यामध्ये प्रभाग क्रमांक २८ आणि ३६ चा समावेश आहे . प्रचारफेरी मधील जीपमध्ये महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ , सभगृह नेते श्रीनाथ भीमाले , स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक बाला ओसवाल, प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, सविता वैरागे,राजा शिळीमकर , हंसा चव्हाण, मानसी देशपांडे, श्रीकांत पुजारी, महेश लडकत, शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र शिळीमकर, सुरज लोखंडे, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सुनीता चिंतल,बाळासाहेब ओसवाल,बसवराज शेलार त्याचप्रमाणे महायुती मधील विविध घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
” आले आले रे, भाजप निशाणी घेऊन आले, गिरीश भाऊ बापट आले, ” अशी गीते नागरिकांना प्रचार फेरीच्या माध्यमातून ऐकण्यास मिळाली. डायस प्लॉट आणि सॊलिसबरी पार्क परिसरात श्री बापट यांचे नागरिकांनी अभूतपूर्व असे स्वागत केले. तर चौकाचौकात सुवासिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिले. तर बहुतांशी ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली . मार्केटयार्ड परिसरात व्यापारी बांधवानी श्री बापट यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.