बोहरी समाजाच्या वतीने गिरीश बापट यांचे स्वागत …
पुणे-काल लोकसभा प्रचाराच्या धामधुमीत बोहरी समाजाच्या वतीने पालकमंत्री गिरीष बापट यांचे स्वागत करण्यात आले . समाजाच्या प्रमुख ट्रस्टी यांनी यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे लोकसभा मतदार संघ उमेदवारअसलेल्या बापट यांच्या आजवरच्या कारकीर्दीबाबत समाधान व्यक्त केले . आणि बापटांसारखा नेता पुण्याला लाभावा अशी इछ्या यावेळी व्यक्त केली .
महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी हा कार्यक्रम कँम्प येथील साचापिर ईस्ट्रीट येथे आयोजित केला होता .यावेळी अजय भोसले, महेश लडकत, महेश पुंडे,उज्जवल रासकर,गणेश शेरला व बोहरी समाजाचे पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते