पुणेकरांना दर पाच मिनिटाला बस मिळेल -बापट
पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात ५०० ई-बसेस आणि ८४० सीएनजी बसेसची खरेदी करण्याची प्रकि‘या सुरू झाली आहे. या वर्षी ऑगस्ट पर्यंत पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुरेशा बसेस उपलब्ध होतील. त्यामुळे प्रमुख रस्त्ययांवर पुणेकरांना दर पाच मिनिटाला बस उपलब्ध होऊ शकेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघातील मांजरी, वडगाव शिंदे आणि निरगुडी या ग‘ामीण भागात बापट यांच्या प्रचारार्थ प्रचार ङ्गेरी काढण्यात आली होती. आमदार जगदीश मुळीक, संतोष खांदवे, सुनील खांदवे, हेमलता शिंदे, वैभव शिंदे, रोहिदास उंद्रे, दादा सातव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘पीएमपीच्या ताफ्यात दरवर्षी स्कॅप होणार्या बसेसच्या तुलनेत नव्याने दाखल होणार्या बसेसचे प्रमाण अत्यल्प होते. २०१३ ते २०१७ कॉंग‘ेस पक्षाच्या उदासिनतेमुळे केवळ १२ नव्या बसेसची खरेदी करण्यात आली होती. भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर एका वर्षांत बसेस खरेदीची प्रकि‘या सुरू झाली. २६ जानेवारीला २५ ई-बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या. या महिन्या अखेर १२५ बीआरटी, जुलैमध्ये ४०० सीएनजी आणि सप्टेंबर २०१९ मध्ये सीएनजी तत्त्वावरील ४४० सीएनजी भाडेतत्त्वावरील सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे या वर्षी ऑगस्टपर्यंत दर पाच मिनिटांत बस उपलब्ध होऊ शकेल.’
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा सुरू केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवीन येणार्या बसेस एससी असल्याने आरामदायक आहेत. तसेच त्या पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुणेकरांना सक्षम, सुरक्षित, सुलभ व जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बसेस खरेदीसाठी आवश्यक असणारा केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’