रिक्षाचालकांसाठी आवश्यक उपाययोजना करणार-बापट
पुणे-प्रवाशांना मीटर सेवा देण्यासाठी शासनाकडून रिक्षा ऍप सुरू करणे, रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी, चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली रिक्षांची कर्जमाफी , स्मार्ट सिटीत रिक्षाला सहभागी करून अत्याधुनिक प्रिपेड थांबे, आणि रिक्षाचा विमा हप्ता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.
पुणे शहर ऑटो चालक मालक कृती समितीच्य वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात श्री. बापट बोलत होते. अशोक येनपुरे, राजश्री शिळीमकर, डॉ. भरत वैरागे, बाबा शिंदे, एकनाथ ढोले, बाबा कांबळे, बाप्पू भावे, दत्ता पाटील, चंद्रकांत गोडबोले, बादशहा सय्यद, सुरेश जगताप, अनिल यादव, अरविंद गाडे, ठकसेन पोरे, अरुण थोपटे, अशोक साळेकर, जीवन धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
बापट पुढे म्हणाले, ‘शहरात सुमारे दीड लाख कुटुंबे रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहेत. या कुटुंबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न मी मार्गी लावले आहेत. भविष्यात प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. रिक्षाचालकांना समाजाम मानसन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे शहरातील रिक्षा व्यावसायिक महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा ठाम विश्वास आहे.
ऍम्युनिशन फॅॅक्टरीच्या कामगारांना भेट
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज सकाळी ऍम्युनिशन ङ्गॅक्टरीच्या कामगांराच्या भेटी घेतल्या. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पुणे शहराचे महत्त्व वेगळे आहे. ते जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन श्री. बापट यांनी यावेळी दिले. देशाच्या सिमेवर लढणार्या जवाना इतकेच मोलाचे काम ऍम्युनिशन फॅॅक्टरीचे कामगार करीत असल्याच्या भावना बापट यांनी व्यक्त केल्या.
दत्ता खाडे, परशुराम वाडेकर, प्रशांत बधे, चिंतन शहा, शाम काची अमर देशपांडे मुकेश गवळी कमलेश पांगुवाले, अजित पवार, किरण वायलारकर, संतोष गव्हाणे, यश सुर्ती, चेतन सत्तूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाणी समाजाचा पाठिंबा
अखिल लाडशाखीय वाणी समाजाने पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांना जाहीर पाठींबा दिला. बापट यांच्या समर्थनार्थ कोथरूड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वाणी समाज सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. हा समाज कायमच महायुतीच्या पाठीमागे उभा राहीला. मी समाजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पुणे शहराच्या गतीमान विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. नगरसेवक दीपक पोटे, कैलास वाणी, शाम शेंडे, डॉ. जगदीश चिंचोरे, अनिल चितोडकर, विवेक शिरोडे यावेळी उपस्थित होते.