बैलगाडीत बसुन बापटांच्या प्रचारफेरीची सुरुवात ..
पुणे-भाजपा-शिवसेना-आरपीआय(आय)-शिवसं ग्राम-रासप महायुतीचे उमेद्वार गिरीष बापट यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी येथे दुचाकी रॅली काढुन प्रचार फेरी करण्यात आली. या प्रचारफेरीची सुरुवात नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बाणेर-बालेवाडी जनसंपर्क कार्यालयापासुन करण्यात आली. यावेळी बाणेर बालेवाडी भागातील शेतकरी कुटुंबीयांच्या हस्ते गिरीष बापट यांचा सन्मान करण्यात आला व शेतकर्यांच्या आग्रहास्तव व सन्मान करत यावेळी या प्रचार फेरीची सुरुवात गिरीष बापट यांनी बैलगाडीत बसुन केली. यावेळी स्मार्ट सिटी पायलेट प्रोजेक्ट म्हणुन बाणेर-बालेवाडीची निवड झाली असताना याभागातील शेतकरी बांधवांची मने व त्यांचा सन्मान जपुनच या भागाचा स्मार्ट विकास केला जाईल असे सर्व उपस्थित शेतकर्यांना गिरीष बापट यांनी आश्वासन दिले.
यावेळी प्रभागातील विविध ठिकाणी ग्रामस्थांनी उत्साहीपणे गिरीषजी बापट यांचे औक्षण करुन स्वागत केले व ज्येष्ठ नागरीकांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेकडोंच्या संख्येने युवक, महिला तसेच उत्साहाने ज्येष्ठ नागरीक देखील उपस्थित होते.
तसेच भाजपा-शिवसेना-आरपीआय-शिवसंग्रा म-रासप महायुतीचे सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Attachments area