पहिल्याच प्रचार सभेत ‘क्रीम रोल’ ..ची अनुभूती ?
पुणे-भाजपचा बालेकिल्ला समजणाऱ्या कोथरूड मध्येच भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या पहिल्याच प्रचार सभेला सुरुंग लागल्याचे चित्र आज सायंकाळी दिसून आले.या सभेसाठी झालेली सात आठशे लोकांची गर्दी फार काळ तग धरून बसू शकली नाही आणि सभेचा फज्जा उडाला ..या पार्श्वभूमीवर …
माझ्या प्रचार यंत्रणेत काकडेंचा ‘क्रीम रोल’ असेल अशा बापटांच्या मिश्कील टिप्पणीवर आज या सभेनंतर प्रती टिप्पणी व्यक्त होत होती . भाजपचे पालकमंत्री आणि लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या बापटांना ‘क्रीम रोल ‘ची अनुभूती आल्याची खुशखुशीत चर्चा गमतीने घडत होती . काकडे हे कोल्हापूरच्या प्रचार सभेस उपस्थित होते मात्र पुण्यातील पहिल्याच प्रचार सभेस मात्र ते अनुपस्थित होते.भर दुपारी मुख्यमंत्र्यांनी सदाशिवात घेतलेल्या सभेचे पूर्वी ‘वाजलेले बारा ‘या घटनेचीही आठवण यावेळी काढली जात होती .
लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यावर गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत ,’आपण जे जे इच्छुक होते त्यांना भेटणार आहोत असे सांगून …खासदार संजय काकडे यांचा काय रोल असेल ? या प्रश्नाला उत्तर देताना ‘त्यांचा क्रीम रोल असेल ‘ असे उत्तर दिले होते यावेळी कोथरुड चे शिवसेनचे माजी आमदार त्यांच्या शेजारीच बसले होते त्यांच्यासह अनेक जन यावेळी खळखळून हसले होते .
दरम्यान गमतीचा भाग सोडला तरी ; लोकसभेसाठी संजय काकडे यांनी बांधलेली बहुजन समाजाची मोट आता प्रत्यक्षात बापटांच्या बाबत निवडणुकीत काय भूमिका घेईल ? हा प्रश्न आणि नक्की कोणाचा रोल’ क्रीम ‘ म्हणजे खरोखर महत्वाचा राहील ?अशा प्रश्नांची उत्तरे मात्र निकालापर्यंत अनुत्तरीत राहणार आहे.