पुणे- नगरसेवकांच्या वार्ड स्तरीय निधीतून प्रत्येकी १ लाख आणि मानधनातून काही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने पाठवने गरजेचे आहे असे निर्देश देणारे पत्र आज भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे .त्यानुसार सोमवारी हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या हस्ते सोपविला जाणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातले आहे. लाखो लोकांवर हे महासंकट कोसळले असून हजारो संसार उघड्यावर आले आहेत. आपद्ग‘स्तांना मदत करण्यासाठी पुणे महापालिकेत भाजपचे सर्व नगरसेवक आपल्या वॉर्डस्तरीय रकमेतून प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी आणि एक महिन्याचे मानधन मु‘यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. या विषयाचे पत्र शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज महापौर मुक्ता टिळक यांना दिले. हा निधी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मु‘यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने शहरातील संस्था, संघटनांची बैठक सोमवारी (१२ ऑगस्ट) दुपारी ४ वाजता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, मार्केट यार्ड, बार कौन्सिल, शिक्षण संस्था, सहकारी क्षेत्रातील संस्था, वैद्यकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्यांच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.