नव्या बॅचची सुरुवात ४ एप्रिल पासून
- समर कॅम्प व वार्षिक प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी येत्या २३ व २४ मार्च रोजी
- गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे प्रशिक्षण केंद्र हे डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शास्त्री नगर, येरवडा, पुणे येथे
- प्रशिक्षण ४ एप्रिल पासून सुरु होणार
- पूर्व नोंदणीसाठी संपर्क साधा : व्हाट्सअप क्रमांक- ९११२२९५५६६
पुण्यातील जागतिक दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या उद्येशानी गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाची सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे नामांकित खेळाडू असलेले गॅरी कर्स्टन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पहिले आहे. विश्वचषक २०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघच्या विजयामध्ये यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या जबाबदारी नंतर कर्स्टन यांनी आपले लक्ष कोचिंगच्या क्षेत्राकडे वळवले आहे.
गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाच्या समर कॅम्प व वार्षिक प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी येत्या २३ व २४ मार्च रोजी करण्यात येणार आहे. त्याचे प्रशिक्षण ४ एप्रिल पासून सुरु होणार आहे. समर कॅम्प, वार्षिक प्रशिक्षण, शनिवार- रविवार प्रशिक्षण, वैयक्तिक प्रशिक्षण व सांघिक प्रशिक्षण याची नाव नोंदणी या दरम्यान करण्यात येणार आहे. या क्रिकेट प्रशिक्षणामध्ये ४ वर्षापुढील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे प्रशिक्षण केंद्र हे डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शास्त्री नगर, येरवडा, पुणे येथे असणार आहे.
यावेळी गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO), श्री. आनंद मित्तल व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर(COO), मुख्य प्रशिक्षक श्री. रायन व्हॅन निकर्कं उपस्थित होते. याप्रशिक्षणा मध्ये प्रशिक्षक म्हणून उपेन्द्र कुलकर्णी व महेश हटकर यांचा समावेश असणारा आहे.
याप्रसंगी बोलताना श्री. आनंद मित्तल म्हणाले की “ पुणे व पुण्याच्या जवळील शहरांमध्ये अनेक उत्तम खेळाडू आहेत. यातील अनेकांनी राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावर आपली कीर्ती स्थापित केली आहे. असेच खेळाडूना अंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन घडवण्याचा गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचा महत्वाचा उद्येश आहे.” तसेच ते म्हणाले की “एका वेळी १ हजार खेळाडू क्रिकेट प्रशिक्षण घेऊ शकतील इतक्या क्षमतेचे मैदान येथे उपलब्ध आहे.”
श्री. रायन व्हॅन निकर्कं म्हणाले की, “आमच्याकडे अनेक सुप्रसिद्ध प्रशिक्षण कार्यक्रम व उत्तम प्रशिक्षक पद्धती आहेत. आम्ही भारतातील तरुण खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक देण्यासाठी येथे आहोत. तसेच आम्ही आमच्या प्रशिक्षकांना जगभरातील क्रिकेटचे आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान देण्यासाठी गुंतवूक करत आहोत. प्रत्येक खेळाडूवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न असतो.“ असे ते म्हणाले.
प्रशिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे
- रायन व्हॅन निकर्कं यांच्या कडून वैयक्तिक प्रशिक्षण:- हे सत्र सोमवार ते शुक्रवार असणार आहे. यात दुपारी ४ ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रत्येकी एका तासाच्या ३ बॅच घेतल्या जातील.
- समर कॅम्प:- हे सत्र सोमवार ते शुक्रवार असणार आहे. यात सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते ७ यावेळेत प्रत्येकी दीड तासाच्या ४ बॅच घेतल्या जातील. यामध्ये प्रत्येक सत्रात १५० खेळाडू नाव नोंदणी करू शकतात. याचा पहिला कॅम्प एप्रिल मध्ये तर दुसरा मे महिन्यात असणार आहे.
- शनिवार- रविवार (विकेंड) प्रशिक्षण:- सहा महिन्याचा कालावधी असलेले हे सत्र शनिवार ते रविवार असणार आहे. यात सकाळी ७ ते ९ व दुपारी ४ ते ६ यावेळेत प्रत्येकी दोन तासाच्या २ बॅच घेतल्या जातील.
- वार्षिक प्रशिक्षण व सहामाई प्रशिक्षण:- हे सत्र सोमवार ते शुक्रवार असणार आहे. यात दुपारी ४ ते संध्याकाळी ८.३० या वेळेत प्रत्येकी दीड तासाच्या ३ बॅच घेतल्या जातील.