अफगाणीस्तानच्या तरूणाईला शिक्षणाशी जोडणार्या ‘असीम फाऊंडेशन’ च्या ‘अभिलाषा’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद
पुणे :
अफगाणीस्तानच्या तरूणाईला शिक्षणाशी जोडणार्या ‘असीम फाऊंडेशन’ च्या ‘अभिलाषा ऑनलाईन मार्गदर्शन’ उपक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. अफगाणीस्तान येथील युवतींना आय टी च्या सहाय्याने एम्प्लॉयर करण्यासाठी ‘डिजीटल सिटीझन फंड’ आणि ‘असीम फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिलाषा’ ऑनलाईन मार्गदर्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींशी विनसिसच्या सुलक्षणा देवरे आणि हरमनच्या शीतल देशपांडे यांनी ‘IT Ecosystem and Programing Logic Techniques’’ याबद्दल संवाद साधून मार्गदर्शन केले. ‘असीम फाऊंडेशन’च्या पुण्यातील कार्यालयातून ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. निवड झालेल्या 15 अफगाणी युवतींसाठी हा मार्गदर्शन वर्ग झाला.
एकूण शंभर मुलींना पुढील दोन वर्षांत ‘अभिलाषा’ उपक्रमातंर्गत ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून चार महिन्यांच्या ऑनलाईन प्रशिक्षणानंतर ह्या मुली फेबु्रवारी महिन्यामध्ये भारतात येणार आहेत.
प्रशिक्षण उपक्रमामध्ये फरेश्तेह अरीया यांनी भाषांतराची धुरा सांभाळली आहे. तर मुग्धा कुलकर्णी यांनी संयोजन केले आहे. पहिल्या सत्राप्रमाणेच याहीवेळी अतिशय उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. सप्टेंबर महिन्यात पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. ‘असीम फाऊंडेशन’ चे अध्यक्ष सारंग गोसावी, निरुता किल्लेदार, संस्कृती बापट, सई बर्वे उपस्थित होते.