नृत्यभारतीतर्फे
‘स्रोतस्’ कथक मैफल
पुणे : “नृत्यकला म्हणजे उपासना, साधना मानून स्वत:च्या मिळालेल्या कलेचा वारसा श्रध्देने पुढे नेणारे लखनौ घराण्याचे प्रसिद्ध नर्तक सुभाषचंद्र यांच्या ‘स्रोतस्’ या कथक मैफिलीचे आयोजन येत्या सोमवारी (दि.२०) करण्यात आले आहे. नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे बालशिक्षण सभागृहात ही मैफल सायंकाळी ५ वाजता भरविण्यात येणार आहे.
त्यकलेचे इतिहासकार आणि सुप्रसिद्ध समीक्षक पद्मश्री सुनील कोठारी यांची विशेष उपस्थिती यावेळी लाभणार आहे.