देशद्रोहाचा गुन्हा दाखल…
पुणे-जंतर मंतर, नवी दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जळणाऱ्या समाजकंटकां विरोधात डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा दाखल(देशद्रोह १२४अ, १५३ अ, २९५, २९८ भ.द.वि, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंद) कायदा, १९८९, प्रेव्हेंशन ऑफ इंसल्ट टु नॅशनल हॉनर्स ऍक्ट, १९७१).
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष- सतीश गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली.
त्यांच्या सोबत ऍडव्होकेसी असोसिएशनचे अध्यक्ष- अड तोसीफ शेख, अड कुमार काळेल- पाटील, निर्भीड महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष- प्रा. संतोष खरे, रवी ओव्हाळ, प्रमोद कांबळे, सागर सपकाळ, निशिकांत कांबळे, हरीश भिंगारे, भूषण भवर, सागर चौधरी, अकबर शेख उपस्थित होते .