पुणे: माहिती तंत्रज्ञान, सल्ला सेवा आणि व्यवसाय सुविधा पुरविणारी आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) टीसीएस आयटी विझ २०१९ च्या पुणे फेरीच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. टीसीएस आयटी विझ ही देशातील सर्वात मोठी आंतरशालेय तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा असून याची पुणे फेरी १९ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडली.
विजेते – प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, पुणे, रिषी एल. आणि रीग्वेद डी.
उपविजेते – हचींग्स हाय स्कूल, पुणे, अनिश के. आणि आर्यन जैन
यंदाच्या वर्षी टीसीएस आयटी विझच्या पुणे फेरीत इयत्ता आठवी ते बारावीच्या ६५० हून जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या टोटल या संस्थेच्या रिफायनरी 4.0 प्रोग्रामचे डिरेक्टर सिल्व्हेन कॉमिटी आणि टीसीएस पुणे चे सेंटर हेड सचिन रत्नपारखी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. भाग्यशाली विजेत्यांना ट्रॉफी व ६०,००० रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना यावर्षीच्या अखेरीस मुंबई येथे होणार असलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीत पुणे शहराचे प्रतिनिधित्व करण्याचा मान देखील मिळणार आहे. राष्ट्रीय अंतिम फेरीत त्यांच्यासोबत इतर ११ क्षेत्रीय विजेते असतील. पुणे फेरीच्या उपविजेत्यांना खास डिझाईन केलेले मेडल्स व ४०,००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आले. तसेच पुणे फेरीच्या अंतिम टप्प्यातील चार संघांना देखील ५००० रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आली.
या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांमधील कितीतरी जणांनी ट्विटर व इन्स्टाग्राम स्पर्धेत भाग घेतला. टीसीएस आयटी विझ २०१९ च्या पुणे फेरीबद्दल 3046 ट्विट्स व 36 इन्स्टाग्राम स्टोरीज करण्यात आल्या. ‘सर्वात जास्त ट्विट्स’ आणि ‘दिवसभरातील सर्वात चांगले ट्विट’ या स्पर्धांच्या विजेत्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. इन्स्टाग्रामवरील ‘दिवसभरातील सर्वात चांगल्या स्टोरी’ला २००० रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आली.
तंत्रज्ञान कौशल्यांचा वाढत्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या क्विझमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी ट्रेंड्सची माहिती मिळते. स्पर्धक तसेच प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढावा यासाठी ऍनिमेशनचा यावेळी करण्यात आला. क्विझमास्टर गिरी ‘पिकब्रेन’ बालसुब्रमणियम यांनी स्पर्धेच्या पाचही बझर फेऱ्यांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाने स्पर्धेची रंगत वाढविली – डेटा सायंटिस्ट, डेटा अनॅलिस्ट, टेक पॅट्रीऑट व ब्लॉक द चेन आणि टीसीएससंदर्भातील विशेष फेरीचा यामध्ये समावेश होता. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, याच्याशी निगडीत उद्योग, लोक, नवनवीन ट्रेंड्स व लिजंड्स यावर आधारित प्रश्न यावेळी विचारण्यात आले.
भारतात इतर ११ ठिकाणी देखील टीसीएस आयटी विझ २०१९ चे आयोजन केले जाणार आहे – अहमदाबाद, बंगलोर, भुबनेश्वर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, नागपूर, कोची, कोलकाता, मुंबई आणि पुणे. गेल्या वर्षी देशभरातून या स्पर्धेमध्ये १२०६ शाळांचे १३,९०८ विद्यार्थी सहभागी झाले होते.