कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजने पटकावली अलॅक्रिटीची चॅम्पियनशीप.
पुणे-ए.आय.एस.एस.एम.एस.आय.ओ.आय.टीमहा विद्यालयात सांस्कृतिक,तांत्रिक आणि क्रीडा अश्या विविध स्पर्धांचा संगम असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील इव्हेंट “अलॅक्रिटी” ची आज सांगता झाली.ह्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बीएमसी सॉफ्टवेअर,इंडिया चे प्रमुख कार्यकारी अधिकारी तरुण शर्मा हे उपस्थित होते . आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनिर्मितीचा मार्ग अवलंबवण्याविषयी मार्गदर्शन केले.. ह्या “अलॅक्रिटी”चे प्रमुख आकर्षण ठरली ती मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी “पी” च्या त्रिसूत्री बद्दल म्हणजे पेशन्स,पॅशन्,प्रॅक्टिसवर भर दिला. सोनाली कुलकर्णी यांच्या उत्स्फूर्त संवादाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या राष्ट्रस्तरीय फेस्टमध्ये १९ ते २२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान ६० हून अधिक स्पर्धां झाल्या ,ह्याच दिवशी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व अलॅक्रिटीतील विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.अलक्रिटी ची चॅम्पियनशीप हयावर्षी कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिरिंग ने पटकावली .ह्या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या संस्थेचे सचिव श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या संस्थेचे सह सचिव सुरेश प्रताप शिंदे ,खजिनदार अजय पाटील,नियमन मंडळाचे सदस्य भगवानराव साळुंखे व निखिल खणसे व श्रीकांत मोझे हे उपस्थित होते. महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाचाही विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. अलॅक्रिटीचे हे १० वे वर्ष असून यामध्ये केवळ इंजिनीरिंगचेच नाही तर कला,वाणिज्य,विज्ञान,एम.बी.ए,फा र्मसी,विधी अश्या पुणे आणि शहराबाहेरील १२० हून अधिक महाविद्यालयातून स्पर्धक सहभागी झाले.या फेस्टीव्हलसाठी प्राचार्य डॉ.पी.बी.माने यांचे मार्गदर्शन लाभले.या फेस्टीव्हलचे देवेंद्र इटोळे,कुणाल रणवीर,विकास देसाई हे समन्वयक होते. “अलॅक्रिटी” कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी सरचिटणीस ऋतुराज बोकील याने केले.