महाराष्ट्राच्या विकासामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत बहुमूल्य योगदान देणारे सर्वश्री मनोहर जोशी, . शिवाजीराव निलंगेकर पाटील ,सुशीलकुमार शिंदे , पृथ्वीराज चव्हाण ,नारायण राणे , अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी शश्रीमती वैशाली विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार अमित देशमुख , सिनेअभिनेते रितेश देशमुख यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील , माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पालकमंत्री ,खासदार , आमदार , स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे सहा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवणार आहेत.
राज्याचे सहा माजी मुख्यमंत्री जागवणार स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी
देशातील पहिल्या थ्रीडी तारांगणाचे १ मे रोजी
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन
पुणे(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही उदबोधक तथ्यांची माहिती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिकेच्यावतीने सहकारनगर येथील स्व . राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्व. विलासरावजी देशमुख थ्रीडी तारांगणाचे येत्या १ मे रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती माजी उपमहापौर श्री. आबा बागुल यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आबा बागुल म्हणाले कि, आपल्या कारकिर्दीत विज्ञान, तंत्रज्ञानाबाबत विशेष सजग असलेले दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे नाव या तारांगणाला देण्यात आले आहे. दि. १ मे रोजी दुपारी १.३० वाजता प्रभाग क्रमांक ३५ मधील राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल येथे उदघाटन समारंभ होणार आहे. या समारंभास
हे तारांगण संपूर्ण वातानुकूलित आहे. तारांगणाच्या डोम व्यास सुमारे ९. ५० मीटर असून तो ‘एफ. आर. पी . ‘मध्ये तयार करण्यात आला असून १५ अंशात पुढील बाजूस डोम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगोल विश्वात असल्याची अनुभूती मिळते. अवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक ४ के रेझ्यूलेशनचे ३ व्हिज्युलायझे शन डिजीटल तंत्रज्ञानाचा आणि १०. १ क्षमतेच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
अवकाशात असलेल्या ग्रहताऱ्यांची रचना, त्यात घडणाऱ्या ग्रहणांसारख्या घटना याबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत त्रोटक माहिती उपलब्ध होते. ही माहिती दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे जिज्ञासूंसमोर मांडण्यासाठी या तारांगणाची उभारणी करण्यात आली आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद उपळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ३ डी तंत्रज्ञानाचा चष्म्याविरहित वापर करण्यात आला आहे. ५२ आसन क्षमता या तारांगणाची असून खुर्च्या आवश्यक त्या कोनात पुढे -मागे होणाऱ्या असून स्लीपिंग चेअर पद्धतीच्या आहेत. जगात प्रसिद्ध असलेल्या आणि फुलडोम पद्धतीचे थ्री डी फिल्म्स ,शो करणाऱ्या फुलडोम प्रो या रशियन उत्पादक कंपनीने सर्व्हर आणि सॉफ्टवेअर पुरविले आहे. हायडेफिनेशनचे आठ प्रोजेक्टर उच्चक्षमतेची आधुनिक ध्वनी यंत्रणा आहे. सद्यस्थितीत कंपनीने इंग् रजी माध्यमातील २० फिल्म्स उपलब्ध करून दिल्या असून मराठी आणि हिंदी माध्यमातूनही फिल्म्स दाखविणे सहजशक्य आहे. देशात मोजकीच तारांगणे उपलब्ध असून पुण्यातील हे तारांगण अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे .