अकरावी ,बारावी चा अभ्यासक्रम ‘महाविद्या ‘ ई -tab ‘ वर उपलब्ध
पुणे :
दहावीचा निकाल ऑन लाईन सोमवारी लागणार असताना उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी -बारावीचा अभ्यासक्रम असणारा ‘महा विद्या ‘ ‘ ई -tab ‘ १० टक्के सवलतीमध्ये देण्याची घोषणा पुण्यातील ‘बाबा कॉम्प्यूटर्स ‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी नाम मोरयांनी यांनी केली आहे .
उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी बाबा कॉम्प्युटर्स च्या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे .या उपक्रमासाठी ‘महाविद्या’ची हेल्पलाइन देखील सुरू झाली असून, 1800 233 2266 आणि 9371107057 वर विद्यार्थी-पालकांना संपर्क साधता येणार आहे.
www.babacomputers.com / mahavidya आणि
www.mahavidya.co.in. येथेही संपर्क साधता येईल.
उत्तीर्ण विद्यार्थी त्यांच्या ऑन लाईन निकालाची प्रिंट घेवून कॅम्प मधील इस्ट स्ट्रीट वरील बाबा कॉम्पुटर्स ‘ मध्ये गेल्यास त्यांना अकरावी -बारावी अभ्यासक्रम सहित असलेला ‘ ई -tab ‘ १० टक्के सवलतीत मिळणार आहे .
३० वर्षापासून पुण्याच्या संगणक क्षेत्रात कार्यरत ‘ बाबा कॉम्प्युटर्स ‘ ने महाराष्ट्र दिनापासून ‘महा विद्या ‘ ‘ ई -tab ‘ बाजारात उपलब्ध केला असून त्यावर पहिली ते बारावी पर्यंत अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध असून त्याला एनिमेशन आणि व्हाईस ओव्हर ची साथ आहे . इ -लर्निंग अध्यापनासाठी,अध्ययनासाठी हा ‘ ई -tab ‘ उपयुक्त असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे
यामध्ये बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून मूल्यांकन करण्याची सुविधा आहे. निकालाचे मूल्यमापन रिपोर्ट उपलब्ध आहे. चाचणी परीक्षांचे मूल्यमापन करता येणार आहे.’
तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सरस निर्मिती ‘बाबा कॉम्प्युटर्स’ ने केली असून, 7 इंच टच स्क्रीन, 1.2 जीबी प्रोसेसर, अँड्रॉईड 4.2.2 ऑपरेटिंग सिस्टिम, 512 एमबी रॅम, 4 जीबी स्टोरेज, 32 जीबी एक्स्पांडेबल, कॅमेरा 0.3 एमपी, स्पिकर, 3 ते 4 तासांचा बॅटरी बॅकअप इतक्या सुविधा या ‘टॅब’मध्ये असणार आहेत.
नाम मोर्यानी म्हणाले, ‘शिक्षकांना शिकविण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तसेच पालकांना अभ्यास घेण्यासाठी या टॅब्लेटचा उपयोग होणार आहे. केजीसाठी महाविद्या शैक्षणिक सॉफ्टवेअरसह 7,999/- असून, अकरावी व बारावीसाठी रुपये 11,999/- अशी या टॅबच्या किंमतीची रेंज आहे. एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.’