पुणे – “डिझाईन शिक्षणाचा प्रवास कौशल्ये शिकण्यापासून आता डिझाईन प्रक्रियेमागच्या संकल्पना समजून घेण्यापर्यंत झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ डिझाईन तयार करण्यावर मर्यादित न राहता या डिझाईनच्या कौशल्याने आपल्या व्यवसायनिर्मितीत अजून वाढ कशी करावी याचा विचार करावा,” असे मत वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे बिझिनेस डिझाईनचे डीन प्रा. सुधाकर नाडकर्णी (माजी एचओसी, आईडीसी-आयआयटी) यांनी व्यक्त केले.
डीएसके इंटरनॅशनल कॅम्पसच्या डिझाईन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इंडस्ट्रीयल डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील आपल्या कार्याचे सादरीकरण करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून त्यात विविध स्केचेस, मॉडेल्स आणि प्रोटोटाईप्सचा समावेश आहे. जेन्स्लर बेंगलुरु येथील पारितोषिक विजेते ज्येष्ठ आर्किटेक्ट दिवाकर चिंतला यावेळी सन्माननीय अतिथी होते. याप्रसंगी डीएसके उद्योग समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी हेही उपस्थित होते.
”साध्या इस्त्रीच्या डिझाईन पा