पुणे :
“पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चा 16 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे शहरात आयोजन करण्यात आले होते.
झेंडा वंदन
“पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चा 16 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालय (टिळक रोड) येथे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी रविंद्र माळवदकर, बापू पठारे, अश्विनी कदम, सुनील बनकर, श्रीकांत पाटील, अंकुश काकडे, सुभाष जगताप, भगवान साळुंके, वैशाली बनकर, मीना परदेशी, दिनेश धाडवे, आनंद रिठे, शारदा ओरसे, बाबुराव चांदेरे, विशाल तांबे, आनंद रिठे, अप्पा रेणूसे, रूपाली चाकणकर, विपुल म्हैसकर, अमित अगरवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वच्छता नारायण पूजा
पुणे शहरात “स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. यासाठी स्वच्छता नारायण पूजा घालण्यात आली व “समाज प्रबोधन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पालवे गुरुजी यांनी गाडगे महाराजांचा एकपात्री 1,850 वा प्रयोग करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक दीपक मानकर, कसबा विधानसभा अध्यक्ष दीपक जगताप, रत्ना नाईक, सादिका पारेख, गणेश नलावडे, अनिल अगावणे, अरुण गवळी, राहुल राऊत, सूर्यकांत येनपुरे यांनी केले होते.
पी.यू.सी. चाचणी शिबीर
वर्धापन दिनानिमित्त “पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस’च्या वतीने मोफत पी.यू.सी चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे राकेश कामठे, मनोज पाचपुते, रूपेश संत, अभिषेक पळसकर, मंदार घुले, तुषार गायकवाड, सौरभ बडदे, विशाल मोरे, वर्धन बोरगावे यांनी केले होते.
विविध प्रकारचे दाखल्यांचे अल्पदरात वाटप
पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातुन विविध प्रकारच्या दाखल्यांचे अल्पदरात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शारदा ओरसे, निलेश निकम, उदय महाले, अमित अग्रवाल, बाळासाहेब चव्हाण, युसूफ पठाण, अमर जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शशिकांत जगताप यांनी केले.
कार्यकर्ता “करिअर ऍक्शन’ संपर्क पत्रिकेचे प्रकाशन
महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते “कार्यकर्ता करिअर ऍक्शन’ या संपर्क पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पत्रिकेचे संयोजन शंकर शिंदे यांनी केले.
वृक्षारोपण
प्रभाग क्रमांक 44 सातववाडी येथे 75 वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वैशाली बनकर व सुनील बनकर यांनी केले.
धान्य वाटप
“साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीने सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ‘आपलं घर’ सिंहगड पायथा, डोणजे पुणे येथे अनाथ मुले, मुली तसेच वृद्धांना धान्य व जेवण्यासाठी थाळ्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे “साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’चे पुणे शहराध्यक्ष चैतन्य उर्फ सनी मानकर, आणि राहुल कुमठेकर यांनी आयोजन केले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रभाग क्रमांक 2 च्या वतीने वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्त्कार, मोफत पी.यू.सी चाचणी शिबिर ठेवण्यात आले होते. संजीला पठारे, महेंद्र पठारे यांनी आयोजन केले होते.
खाऊ वाटप
सामाजिक न्याय परिषदेच्या वतीने गुरूवार पेठेतील अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आनंद रिठे यांनी केले.
नेत्रदान अर्ज
पक्षाचा “वर्धापन दिन’ आणि “जागतिक नेत्रदान’ दिनानिमित्त नेत्रदान अर्ज भरण्यात आले. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नेत्रदान अर्ज भरण्यात आले. या कार्यक्रमाचे सुनीता मोरे यांनी आयोजन केले होते.