पुणे, 23 ऑगस्ट 2019: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत 150हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा 24 ते 27 ऑगस्ट 2019 या कालावधीत फ्युचर प्रो टेनिस अकादमी, येरवडा येथील टेनिस कोर्टवर पार पडणार आहे.
ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्पर्धेच्या संचालिका राधिका कानिटकर-तुळपुळे यांनी दिली.