पुणे :
“पुणे ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी’, “दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’ आणि “ऑक्युलोप्लास्टिक असोसिएशन ऑफ इंडिया’ यंाच्या संयुक्त विद्यमानेे नेत्रतज्ज्ञांसाठी नुकतेच “ऑक्युलोप्लास्टी फॉर एव्हरीवन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारची नेत्रतज्ज्ञांसाठी पहिलीच एकदिवसीय कार्यशाळा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पार पडली.
या कार्यशाळेमध्ये डॉ. माधव भट (अध्यक्ष, “पुणे ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी), पद्मश्री डॉ.अशोक ग्रोवर, डॉ. अप्जीत कौर (अध्यक्ष, ऑक्युलोप्लास्टीक असोसिएशन ऑफ इंडिया) आदी नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्र तज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांनी केले होते.
या कार्यशाळेमध्ये डोळ्यांचे कॅन्सर, केमोथेरपीच्या उपचार पद्धती, नेव्हिगेशन शस्त्रक्रिया तंत्राचा उपयोग, कॉस्मॅटिकशस्त्रक्रिया, कृत्रिम डोळे, बोटॉक्स अशा नवीन दुर्मिळ शस्त्रक्रिया पद्धती अशा विविध विषयांवर नेत्रतज्ज्ञांनी सादरीकरण केले.
या कार्यशाळेमध्ये भारत, बांग्लादेश आणि नायजेरियामधून 180 नेत्रतज्ज्ञ सहभागी झाले होते.
अश्रुंसंबंधी ग्रंथींचे व्यवस्थापन या विषयी डॉ. रघूराज हेगडे, कृत्रिम डोळे या विषयी डॉ. रमेश मूर्ती, सौंदर्यशास्त्र संयोजन उपचार पद्धती विषयी डॉ. मिलिंद नाईक, चेहऱ्याचे वृद्धत्व या विषयी डॉ.देबराज शोमे, पापण्यांची दुर्मिळ शस्त्रक्रिया या विषयी डॉ. पूनम जैन या सारख्या अनेक महत्वाच्या शस्त्रक्रियांविषयी विविध तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.