पुणे :-अनिल चौधरी
1 मार्च अर्थात जागतिक नागरी संरक्षण दिन , यानिमित्त नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बाळासाहेब आढागळे साहेब यांच्या नियंत्राणाखाली पुणे पर्वती येथील कार्यालयात दलाचा सरंक्षण दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
पुणे येथील पर्वती कार्यालय येथे दलाच्या सर्व विभागीय अधिकारी , उपविभागीय अधिकारी , महिला अधिकारी , स्वयंसेवक तसेच नागरिकांनी दलाच्या उपनियंत्रकाना मानवंदना दिली.
नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बाळासाहेब अढागळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती येथील कार्यलयापासून मार्गे मित्रमंडळ चौक , राजीव गांधी ई लर्निग स्कुल ते शाहू कॉलेज चौक ते पुन्हा मुख्य कार्यालय अशी प्रभात फेरी काढण्यात आली.
याप्रसंगी बोलताना उपनियंत्रक अढागळे म्हणाले की, नागरी सरंक्षण दल हे नागरिकांच्या संरक्षणा साठी आहे. कुठलीही राष्ट्रिय आपत्ति आल्यास नागरी दल हे नेहमी तप्तर असते. दलातर्फे नागरिकांना पुर आल्यास पुराच्या पाण्यातून स्व:ता चे तसेच इतर नागरिकांचे कसे संरक्षण करायचे , तसेच आग लागल्यास कसे सरंक्षण करायचे , तसेच भूकंप आल्यास कसे सरक्षण करायचे इत्यादि चे मोफत प्रशिक्षण दिले जाते तरी सर्व नागरिकांनी दलाचे प्रशिक्षण घेऊन स्व:ताचे तसेच इतर नागरिकांचे जिव वाचवावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बाळासाहेब अढागळे , सहा उपनियंत्रक अर्जुन कुऱ्हाडे , सहाउपनियंत्रक आनंद शिंदे , सहाउपनियंत्रक दिलीप कांबळे , विभागीय अधिकारी दिलीप जाधव , विभागीय अधिकारी योगेश परदेशी , जॉर्ज स्वामी , उपविभागीय अधिकारी सुषमा खटावकर , धनंजय मुरुड़कर , कुलकर्णी मॅडम , विभागीय अधिकारी अलका भोसले तसेच अधिकारी , स्वयंसेवक व् नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते