पुणे कॅम्पमधील रेसकोर्सजवळील गुरुनानक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा यंदाचा दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागला . यंदा दहावीमध्ये अगमजोतकौर चौधरी या विद्यार्थीने ९५ टक्के प्राप्त करून शाळेत प्रथम क्रांमाकाने उत्तीर्ण झाली . तर दुसरा क्रमांक ओमकार ओमादीने ९४ टक्केने उत्तीर्ण झाला . तिसरा क्रंमांक गुरुप्रेम सिंहने ९० टक्के गुण प्राप्त केले . शाळेत अन्य विद्यार्थीदेखील प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण झाले.
बारावीच्या निकालात वाणिज्य या शाखेमध्ये प्रथम क्रमांक हरनीतसिंह जौलीने ८६ टक्के गुण मिळविले तर दुसरा क्रमांक शास्त्र शाखेतील अभिषेक लिमकर याने ८५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकावर राहिला .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनदन शाळा समितीचे अध्यक्ष सरदार प्रकाशसिंग घई , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष हरमिंदरसिंग घई , सरचिटणीस चरणजितसिंग सहानी , शाळेचे सचिव सरदार तरमिंदरसिंग व्होरा , खजिनदार सरदार कुलजितसिंग चौधरी , शाळेच्या मुख्याध्यापिका सुबीनकौर जग्गी , प्रशासक भूपिंदरकौर सहानी व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे अभिनदन करण्यात आले .
शाळेच्या मुख्याध्यापिका सुबीनकौर जग्गी यांनी निकालाबाबत सांगितले कि , शाळेतील शिक्षकांनी जादा तास घेऊन विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतली . त्यासाठी पालकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली आणि विद्यार्थ्याची माहिती पालकांना देण्यात आली . अभ्यासात कमी असणाऱ्या विद्यार्थ्याकडून जादा अभ्यास करून घेण्यात आला . या सर्व प्रयत्नातून १०० टक्के निकाल लागला .