क्रेडाई पुणे – मेट्रोच्या ‘घर खरेदी उत्सवास’ उदंड प्रतिसाद
घर घेण्याची सुवर्णसंधी
पुणे : क्रेडाई पुणे – मेट्रोने कालपासून ‘घर खरेदी उत्सव’ या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. अवघ्या एका दिवसातच या प्रदर्शनास पुणेकर नागरिकांनी तसेच महाराष्ट्रातील इतर लोकांनीदेखील भरघोस प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत प्रचंड लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे. तसेच अनेक लोकांनी घरांची बुकिंगदेखील केली आहे.
या प्रदर्शनात १२० हून अधिक डेव्हलपर्सने भाग घेतला आहे. तसेच, १००० हून अधिक प्रॉपर्टी प्रकल्पांमधून ग्राहकांना घर निवडता येणार आहे. १० लाखांपासून पुढील किमतीच्या प्रॉपर्टी प्रकल्पांचे सादरीकरण म्हणजेच ‘अफोर्डेबल हौसिंग’ हि संकल्पनादेखील या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देशातील अग्रेसर बँकांचादेखील या प्रदर्शनामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. पुणे हे दर्जेदार जीवनासाठी देशातील दुसर्या क्रमांकाचे शहर आहे त्याच बरोबर देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला असल्याने,ही महत्वाची बाब लक्षात घेऊन क्रेडाई पुणे – मेट्रोने ‘क्रेडीबल‘ घर खरेदी हि संकल्पना मांडली आहे.
“या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या सर्वच प्रकल्पास चांगला प्रतिसाद मिळत आहे. नगर रस्ता, हिंजवडी परिसर, वाकड, पुनवडी, रावेत, तळेगाव, पिंपरीचिंचवड, बाणेर, बालेवाडी, बावधन, चाकण, हडपसर, उंड्री अशा सर्व परिसराच्या प्रकल्पांमध्ये लोक गुंतवणूक करीत आहेत. विशेषत: १० ते ५० लाखांच्या अफोर्डेबल हौसिंग मध्ये लोक गुंतवणूक करीत आहेत.” असेप्रदर्शन समितीचे सदस्य सचिन अग्रवाल यांनी सांगितले. हे प्रदर्शन उद्यापर्यंत सुरु राहणार असून जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रदर्शनाला भेट देणारे व प्रदर्शनामध्येच फ्लॅट बुक करणारे चेतन पटेल म्हणाले, “क्रेडाई पुणे – मेट्रोने या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केल्यामुळे मला तरी बर्याच पर्यायांमधून घर निवडण्यास सोपे गेले आणि तेदेखील कमी दरामध्ये माझे घर झाले आहे.”
फ्लॅट बुक करणारे ग्राहक श्री.कुलकर्णी म् हणाले, ” क्रेडाई- पुणे मेट्रोच्या घर खरेदी उत्सवा मध्ये सर्व सुप्रसिद्ध बिल्डरने जपलेली विश्वासाहर्ता त्याचबरोबर कामा ची उत्तम गुणवत्ता, आणि सर्व सामान्यांना परवडणार्या अफलातून योजना या प्रदर्शित केलेल्या असल्याने आम्ही येथे घर घेण्याचे नक्की केले.”