आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे ‘संवाद ‘ प्रदर्शन
‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘चे आयोजन
पुणे:महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘ च्या वतीने आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे ‘संवाद २०१९’हे वार्षिक प्रदर्शन २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे .सहकारनगर च्या बागुल उद्यानातील पंडित भीमसेन जोशी कलादालनात हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ या वेळात होणार आहे .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते २९ ऑगस्ट ला सकाळी १० वाजता उदघाटन होणार आहे. ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘च्या प्राचार्य डॉ . लीना देबनाथ यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .उदघाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार उपस्थित राहणार आहेत .