पुणे :
राज्य पातळीवरील एमएससीआयटी 2015 (MS-CIT-2015) च्या परीक्षेत “आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’ची विद्यार्थीनी शिफा रफीक खान हिने 200 पैकी 192 गुण मिळवून यश संपादन केले. “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी शिफा खान हिचे कौतुक केले.
“आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’चे उपप्राचार्य गफार सय्यद, विज्ञान विभागाच्या निरीक्षक तस्निम शेरकर आणि शिफा खान हिचे पालक तसेच कॉलेजचे प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शिफा खानचे अभिनंदन केले.