अहमदाबाद – : टाटा इंटरनॅशनल डीएलटीने आज गांधीनगरमध्ये सुरू झालेल्या ट्रक ट्रेलर आणि टायर एक्स्पोमध्ये भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर लाँच केला. टाटा डीएलटीचा इंटेलिजंट ट्रेलर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून, ट्रेलर चालवण्याच्या तसेच देखरेखीच्या अनुकूलनासाठी आवश्यक तो डेटा हे तंत्रज्ञान ऑपरेटरला व ताफा (फ्लीट) व्यवस्थापकाला पुरवते. त्यामुळे मानवी पाठपुराव्यावरील अवलंबित्व कमी होते. हा इंटेलिजंट ट्रेलर रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यात तसेच ट्रेलर बाजारपेठेला सुधारित कार्यक्षमतेने सेवा देण्यात मदत करेल. टाटा इंटरनॅशनल डीएलटी हा भारतातील सर्वांत मोठा ट्रेलर उत्पादक असून, भारतातील ट्रेलर्स आणि ट्रक बॉडीजच्या सर्वांत मोठ्या ब्रॅण्ड्सपैकी एक समजला जातो. ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) प्रमाणित केलेली ही भारतातील पहिली एआयएस ११३ उत्पादन कंपनी आहे. याशिवाय कंपनीला त्यांच्या २५ प्रकारच्या ट्रेलर्ससाठी टीएस-१६९४९-२००९ आणि आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत.
टाटा इंटरनॅशनल डीएलटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजीव बत्रा म्हणाले, “भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर लाँच करताना आज आम्हाला आनंद होत आहे. आम्ही बाजारात आणण्यास सज्ज आहोत अशा इंटेलिजंट ट्रेलर्सच्या मालिकेतील हा पहिला इंटेलिजंट फ्लॅटबेड ट्रेलर आहे. हे वजनाने हलके ट्रेलर्स अधिक भार वाहण्याच्या (पेलोड) दृष्टीने विकसित करण्यात आले असून यामुळे नफ्याची शक्यता वाढते. बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून, कोणतेही उत्पादन विकसित करताना नवकल्पना हा मुद्दा प्रमुख राहील असा आमचा प्रयत्न कायमच असतो. त्याचप्रमाणे आमच्या ग्राहकांना क्रांतीकारी उत्पादने विकसित करून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असतो. किंमत, दर्जा व डिलिव्हरी यांमध्ये स्पर्धात्मक लाभ ठेवून ट्रेलर्स व वाहतूक उद्योगातील संपूर्ण सोल्युशन्स पुरवणारी कंपनी होण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू राहील अशी आशा वाटते.”
ट्रेलरची सुरक्षा, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुधारणे हे इंटेलिजंट ट्रेलरपुढील लक्ष्य आहे; आणि भारतातील ट्रेलर उत्पादक, ताफा व्यवस्थापक आणि कार्गो मालकांना हा ट्रेलर लक्षणीय असे मूल्यवर्धन देऊ करतो. ट्रेलर अँटि-लॉक किंवा इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग नियंत्रण प्रणालीच्या क्षमतांचा लाभ घेत हा ट्रेलर ४० कल्पक ट्रेलर ऑपरेटिंग कार्यांसाठी प्लॅटफॉर्म तयार करतो.
या इंटेलिजंट ट्रेलरने भारतातील ट्रेलर उद्योगाला मूलभूत ब्रेकिंग प्रणालीवरून, प्रगत ब्रेकिंग व सस्पेन्शन या वाहन स्वयंचलनाच्या अधिक उच्च स्तरावर नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी, वाट मोकळी करून दिली आहे. प्रगत टी-ईबीएस (ट्रेलर इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम) थांबण्याच्या अंतरांचे समायोजन करून ट्रेलरच्या ब्रेक व सस्पेन्शन कार्यांवर नियंत्रण ठेवते. ही प्रणाली चालक, ताफा आणि कार्गो मालक यांना ऑनबोर्ड प्रणाली व कार्यात्मक माहितीच्या समृद्ध स्रोतांशी जोडून घेण्याची क्षमताही प्रदान करते.
कार्यात्मक सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच वाहतूक व इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी टाटा डीएलटी कस्टमाइझ करता येण्याजोग्या उपायांची प्रभावी श्रेणी पुरवते. इंटेलिजंट फ्लॅटबेड ट्रेलर प्रोग्राममधील कार्यशीलता अॅड-ऑन तत्त्वावर वापरता येतात. ट्रेलरची कामगिरी सुधारण्यात त्यांचा उपयोग होतो. ट्रेलरमध्ये सहाय्यकारी ठरू शकतील अशा शिफारसकृत कार्यांपैकी काही पुढे दिली आहेत:
Ø टेलगार्ड
Ø ऑप्टीटर्न
Ø बाउन्स कंट्रोल
Ø स्मार्टबोर्ड
Ø ट्रेलर रिमोट कंट्रोल
Ø ऑप्टीलेव्हल
Ø ऑप्टीटायर
२००५ मध्ये स्थापन झालेल्या टाटा इंटरनॅशनल डीएलटीने आपला प्रवास खुल्या बाजारपेठेपासून विस्तारत एकलक्ष्यी व्यवसाय अजेंडावर नेला- हे लक्ष्य म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेलर्स पुरवणे. व्यावसायिक वाहन उद्योगातील गाढा अनुभव गाठीशी असल्याने टाटा इंटरनॅशनल डीएलटीचे ट्रेलर्स देशातील सर्व ट्रेलर खरेदीदारांची पहिली पसंती झाले आहेत. याचे कारण म्हणजे ट्रेलरचे कमी वजन; वॉब्को आणि योर्क यांच्या एकत्रिकरणामुळे अधिक चांगल्या दर्जाचे ब्रेक्स व स्थैर्य; आणि अधिक टिकाऊ टायर्स. दर महिन्याला ७००हून अधिक ट्रेलर्सचे उत्पादन हे टाटा इंटरनॅशनल डीएलएफ ट्रेलर्सचा स्वीकार भारत व परदेशात वाढत असल्याचे लक्षण आहे. याचे श्रेय आहे ते त्यांच्या खात्रीशिरतेला, वाढलेल्या उत्पादनक्षमतेला आणि सेवा पुरवण्याच्या क्षमतेला.
टाटा इंटरनॅशनल डीएलटी प्रायव्हेट लिमिटेडविषयी
२००५ साली स्थापन झालेली टाटा इंटरनॅशनल डीएलटी प्रायव्हेट लिमिटेड ही टाटा इंटरनॅशनल लिमिटेड आणि श्रीलंकेतील डच लंका ट्रेलर मॅन्युफॅक्चुअरर्स लिमिडेट या टाटा एंटरप्राइजमधील जॉइंट व्हेंचर आहे. पुण्यातील वाकी येथे मुख्यालय असलेली ही कंपनी उत्पादनांची निर्मिती टाटा डीएलटी या ब्रॅण्डनावाखाली करते. कंपनीचे उत्पादनकेंद्रे अजमेर, जमशेदपूर आणि पुण्यातील निगोजे येथे आहेत.
भारतात सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या वाहतूक प्रणालींचा पाया टाटा इंटरनॅशनल डीएलटीने घातला आहे. टाटा डीएलटी ही ‘ट्रेलर टाइप कोड एआयएस ११३’ जागतिक सुरक्षा मानक प्रमाणपत्र ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून (एआरएआय) प्राप्त करणारी भारतातील पहिली कंपनी आहे. पुण्यात ऑक्टोबर २०१६ मध्ये कंपनीला हे प्रमाणपत्र प्राप्त झाले.
कंपनी सर्व प्रकारच्या सामान्य ट्रेलर्सचे उत्पादन करते. यामध्ये फ्लॅटबेड, स्केलेटल, साइडवॉल, सेमी लो-बेड, बॉम्ब-कार्ट यांचा समावेश होतो. याशिवाय ट्रक चॅसिस कॅरिअर, कार कॅरिअर, टिप ट्रेलर, कर्टन स्लायडर, कॉइल वेल ट्रेलर या विशेष ट्रेलर्सचे उत्पादन कंपनी करते. उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी कस्टमाइझ्ड ट्रेलर्सचे तसेच संरक्षण विभागाच्या आवश्यकतांनुसार विशेष ट्रेलर्सचे उत्पादन केले जाते. ही मॉडेल्स बहुतेक सर्व प्रकारच्या अवजड मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरतात.
टाटा इंटरनॅशनल डीएलटीकडे ग्राहकांच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सुसज्ज डिझाइन सेंटर आहे. ८,५००हून अधिक ट्रेलर्सच्या उत्पादनाची क्षमता असलेले चार उत्पादन कारखाने आहेत. हे कारखाने पुणे, राजस्थान आणि जमशेदपूर या ट्रेलर बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत. भारतभरात मार्केटिंग, विक्री व सेवाकेंद्रांचे विस्तृत जाळे आहे. टाटा इंटरनॅशनल डीएलटीने उत्पादित केलेले २५,०००हून अधिक ट्रेलर्स भारतीय रस्त्यांवर धावत आहेत, विविध उपयोजनांमध्ये सेवा देत आहेत.
आपण ज्या समुदायांना सेवा देत आहोत त्यांच्या आयुष्याच्या दर्जा दीर्घकालीन भागधारक मूल्यनिर्मितीच्या माध्यमातून सुधारण्याच्या टाटा समूहाच्या मूळ उद्दिष्टाशी सुसंगत असे टाटा इंटरनॅशनल डीएलटीचे धोरण आहे. कंपनी आपल्या कार्यक्षेत्राच्या भोवतालच्या परिसरात कौशल्य विकास, आरोग्य, सुरक्षितता, पर्यावरण आणि शिक्षण या व्यापक क्षेत्रांमध्ये सीएसआर उपक्रमांवर भर देत आहे.