ग्राहकांसाठी विमा योजनेची परिपक्वता रक्कम वाढवण्यासाठी दोन अभिनव वैशिष्ट्ये लाँच
- पहिल्यांदाच अशा प्रकारची वैशिष्ट्ये – रिटर्न ऑफ मोर्टलिटी चार्जेस (आरओएमसी) आणि रिटर्न एन्हान्सर
- कंपनी लाँच करणार असलेल्या युलिपसाठी पार्श्वभूमी
पुणे– बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील आघाडीची खासगी जीवन विमा कंपनी या क्षेत्रातील युलिपची समीकरणे बदलवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने युलिपमध्ये नुकतीच दोन नवी वैशिष्ट्ये लाँच केली आहेत, ज्यात ग्राहकांसाटी विमा योजनेची परिपक्वता रक्कम (मॅच्युरिटी कॉर्पस) लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. ही वैशिष्ट्ये कंपनीच्या ग्राहकांना कंपनीची उत्पादने निवडल्यानंतर त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सक्षमता प्रदान करण्याच्या तत्वाशी सुसंगत आहेत.
रिटर्न ऑफ मोर्टलिटी चार्जेस (आरओएमसी) आणि रिटर्न एन्हान्सर – ही कंपनीने लाँच केलेली महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने ही वैशिष्ट्ये पहिल्यांदा बजाज अलियान्झ लाइफ गोल अश्युअरसोबत लाँच केली आणि त्यांना बजाज अलियान्झ लाइफ गोल बेस्ड सेव्हिंग्जमध्ये परत आणली आहेत. दोन्ही युलिप्स त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आली आहेत व त्याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या जीवनध्येयासाठी सोप्या व प्रभावी मार्गाने गुंतवणूक करण्यासाठी सक्षम करतील अशा प्रकारे तयार करण्यात आली आहेत.
नवे उत्पादन आणि युलिपच्या अभिनव वैशिष्ट्यांविषयी मीडियाला उद्देशून बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चौघ म्हणाले, ‘एक कंपनी या नात्याने आम्ही ग्राहकांसाठी त्यांचे जीवन ध्येय मिळवून देणारे बनण्यासाठी आमचे स्वरूप बदलवत आहोत. आमच्याकडे मजबूत आणि सातत्यपूर्ण फंड कामगिरीचा इतिहास आहे आणि ग्राहकांपर्यंत त्यांचा फायदा पोहोचवण्यासाठी आमच्या युलिपची पुनर्रचना करणे व त्यात नाविन्य आणणे महत्त्वाचे होते. आरओएमसी आणि रिटर्न एनहान्सरसारखी वैशिष्ट्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच लाँच केल्यानंतर आमचे युलिप अधिक आकर्षक आणि ग्राहकांसाठी मजबूत मूल्य देणारे झाले आहे. विशिषअट निधी उभारण्याचे आणि इक्विटी बाजारपेठेद्वारे जीवन ध्येय साकारण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्यांसाठी हे उत्पादन सर्वोत्तम आहे.’
रिटर्न ऑफ मोर्टेलिटी चार्जेस – स्पष्टीकरण
जीवन विमा कंत्राटाचे मुख्य उद्दिष्ट हे लवकर मृत्यू पावण्याच्या जोखीमेविरोधात सुरक्षाकवच पुरवणे हे असते. म्हणूनच जीवन विमा कंपनी या नात्याने वेगवेगळ्या जोखमींचे उदा. जीवन सुरक्षा किंवा मृत्यूचे व्यवस्थापन करतो. प्रत्येक जीवन विमा कंपनीसाठी मृत्यूविरोधात सुरक्षा कवच पुरवण्यासाठी एक किंमत सहन करावी लागते. थोडक्यात सांगायचे, तर मोर्टेलिटी चार्जेस म्हणजे ग्राहकाने जीवन विमा कंपनीच्या पहिल्या सेवेसाठी अर्थात जीवन सुरक्षा कवच पुरवण्यासाठी दिलेली रक्कम. युलिपमध्ये अशाप्रकारच्या जीवन सुरक्षा कवचाला मोर्टेलिटी चार्ज म्हटले जाते आणि आणि पॉलिसी टर्ममधून ते वजा केले जाते.
मोर्टेलिटी चार्ज विमाधारकाचे वय, लिंग आणि जोखमीसाठीच्या किंमतीवरून काढले जाते. जीवन सुरक्षा कवच शुल्क परत देणारी पहिली जीवन विमा कंपनी या नात्याने बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स ही रक्कम ग्राहकाच्या परिपक्वता रकमेमध्ये जोडेल तसेच त्यांना विमा योजनेत गुंतवणूक कायम ठेवण्यास प्रोत्साहन देईल, कारण ही रक्कम योजना परिपक्व झाल्यानंतर त्यांना मिळेल.
बजाज अलियान्झ लाइफ ही देशातील पहिली जीवन विमा कंपनी आहे, जी जीवन सुरक्षा कवच पुरवण्यासाठी वजा करण्या आलेली रक्कम परत देते. हे वैशिष्ट्य या क्षेत्रातील युलिप्सचा मापदंड उंचावेल आणि ग्राहकासाठी युलिप अधिक आकर्षक व किफायतशीर बनवेल.