वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता घेऊन येईल
प्रारूप जीएसटी कायद्यात बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने एक समस्या आहे. त्यामुळे कदाचित घर खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणारा एकूण कर (मुद्रांक शुल्कासहित) सध्याच्या संपत्तीच्या एकूण किमतीच्या १४ टक्क्यांऐवजी २०-२२ टक्के एवढा वाढण्याची शक्यता आहे.
प्रकल्प आणि यंत्रसामुग्री वगळता वस्तू आणि/किंवा सेवा वापरून तयार झालेले अंतिम उत्पादन हे स्थावर मालमत्ता असेल, तर निविष्ठा (इनपुट) कर पत उपलब्ध नसेल, असे प्रारूप जीएसटी कायद्यात म्हटले आहे.
शांतिलाल कटारिया
अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो.