पुणे- अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी पासून जवळचे गाव , गावातील गाडी , मंदिर,शाळा असे रूप बदलून आता सुप्याला जणू आधुनिक रूप बहाल होते आहे मायडिया ग्रुप या जागतिक ग्राहकोपयोगी उपकरण उत्पादक तसेच फॉर्चुन ५०० कंपनीने आज भारतातील महाराष्ट्र राज्यातील सुपा पारनेर येथे टेक्नोलॉजी पार्कची कोनशिला रोवली उपकरणे,एचव्हीएसी आणि कॉम्प्रेसर यांचे उत्पादन कारखाने असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;मायडिया ग्रुपचे संस्थापक शिंगजियान हे आणि मायडिया ग्रुपचे अध्यक्ष श्री. पॉल फंग यांच्या हस्ते कोनशिला रचण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले: “महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम करते. अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम हाती घेतल्यामुळे आता महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण झाले आहे. आमच्या राज्यात टेक्नोलॉजी पार्क स्थापन करण्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय मायडिया ग्रुपने घेतला याचा मला आनंद आहे. महाराष्ट्र हे उत्पादन, निर्मिती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रवासात याची आम्हाला मदत होईल.”
टेक्नोलॉजी पार्कचे संकुल पुण्याजवळील सुपा पारनेर येथील एमआयडीसी इंडस्ट्रियल पार्क क्रमांक दोन भागात २०१८ मध्ये संपादित करण्यात आलेल्या ६८ एकर परिसरात उभारले जात आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगती राखत, येत्या पाच वर्षांत अंदाजे १,३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून टेक्नोलॉजी पार्क स्थापन करण्याचे मायडियाचे नियोजन आहे. या टेक्नोलॉजी पार्कमध्ये गृहोपयोगी उपकरणे, एअर कंडिशनर्स आणि कॉम्प्रेसर्सचे उत्पादन केले जाईल. गृहोपयोगी उपकरणे,एचव्हीएसी उपकरणे आणि कॉम्प्रेसर्सच्या उत्पादनासाठी या टेक्नोलॉजी पार्कमध्ये कारखाने उभारले जातील.यामध्ये कॅरिअर मायडिया इंडिया या मायडिया आणि यूटीसी क्लायमेट कंट्रोल अॅण्ड सिक्युरिटी (यूटीसी सीसी अॅण्ड सी) यांच्या ६०:४० संयुक्त उपक्रमाचा उत्पादन कारखानाही असेल.
एचव्हीएसी उत्पादनांसाठीचे कॉम्प्रेसर तयार करणारा जगातील सर्वांत मोठा उत्पादक तसेच मायडिया ग्रुपमधील एक कंपनी जीएमसीसीचा कारखानाही टेक्नोलॉजी पार्कमध्ये असेल. या आधुनिक कारखान्यामध्ये ग्रुप गुंतवणूक करत आहे. त्याचप्रमाणे मायडियाच्या कारखान्यांना पूरक भाग पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही टेक्नोलॉजी पार्कमध्ये गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे.
टेक्नोलॉजी पार्कमधून २०००हून अधिक लोकांसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. २०२० सालाच्या सुरुवातीला या संकुलातून व्यावसायिकरित्या काम सुरू होण्याची शक्यता आहे.