पुणे—
‘सेल्फी फोटो’ मध्ये विशेष तंत्रज्ञान विकसित केलेल्या ‘ओपो’ मोबाईल स्मार्टफोनचे पुण्यात गुरुवारी एका रंगारंग कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान आणि ‘ओपो’ कंपनीचे पुणे, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राचे मुख्य संचालक एरिक डेंग आणि कंपनीचे इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यास वरील तिन्ही विभागातील असंख्य डीलर्स आणि विक्रेते यांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री झरीन खान हिने निवडक गाण्यांवर नृत्ये सादर करून उपस्थितांची चांगली करमणूक केली.
तत्पूर्वी ‘ओपो’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्काय ली यांनी, ‘ओपो’ या वैशिष्टयपूर्ण मोबाईल स्मार्टफोनची माहिती देताना सांगितले की, भारतीय ग्राहकांची मागणी लक्षात घेता ‘ओपो’ स्मार्टफोनमध्ये कैमेराचे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्यात आले आहे. हल्ली मोबाईलद्वारे ‘सेल्फी’ काढण्याची ग्राहकांची वाढती क्रेझ आहे. ही क्रेझ लक्षात घेऊन हे कैमेऱ्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय बोटांच्या ठशांचा वापर करून विविध ऍप उघडण्याचे तंत्रज्ञानही या मोबाईलमध्ये आहे. ५.५ इंच लांबीचा स्क्रीन, १६ एमपी फ्रंट कैमेरा, ३ जीबी रैम, ३२ जीबी रोम आणि दिवसभर चालू राहू शकणारी बैटरीची क्षमता अशी या ‘ओपो’ मोबाईलची अन्य वैशिष्ट्ये आहेत अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली
OPPO F1s Key Features:
Screen size: 5.5 inches
Front sensor: 16-megapixel
Main Sensor: 13-megapixel
Touch Access:Lightning-fast fingerprint recognition + fingerprint-activated calling and app launch:
RAM: 3 GB
ROM: 32 GB
Battery: 3075 mAh (Typical) Li-Po Battery (irremovable)
Processor: MT6750 Octa-core
Operating System: ColorOS 3.0, Android 5.1
Storage: 32 GB (Support microSD card up to128GB)
Flash: Flash
SIM Card Type: Dual nano-SIM, individual microSD card