दर्जेदार गुणवैशिष्ट्ये : व्ह्यू मॉनिटर, ८.० फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टिम, चामड्याचे मऊ डॅशबोर्ड आणि डोअर ट्रिम्स
- ऑटो एसीसह ऑफर मूल्य; एबीएस+ ईबीडी+ ब्रेक असिस्ट; दुहेरी एअरबॅग्स आणि निसानच्या स्टँडर्ड गुणवैशिष्ट्यांसह सर्व स्वरूपांसाठी निसान कनेक्ट
- २७ विविध अॅसेसरीजसह ड्राइव्ह पर्सनलायझेशन, या प्रकारातील कोणत्याही कारपेक्षा सर्वाधिक अॅक्सेसरीज
- सर्वात कमी किमतीत उपलब्ध, त्याचबरोबर तीन वर्षांचे मोफत देखभाल पॅकेज
पुणे : लँडमार्क निसानने आज आपली बहुप्रतिक्षित अशी इंटेलिजन्ट एसयूव्ही निसान किक्स भारतात सादर केली. नवी निसान किक्स ही मालकांना प्रीमिअम दर्जा, प्रशस्त अशी अंतर्गत सजावट तसेच स्टायलिश बाह्यरूपाचा अनोखा मिलाफ असलेले मूल्य प्रदान करते. कल्पकता आणि सहज-सुलभता याबाबतीत सर्वोत्तम अशा गुणवैशिष्ट्यांसह सादर करण्यात आलेली नवी निसान किक्स ही ९,५५,००० रुपये या सादर मूल्याला भारतात उपलब्ध आहे. नव्या निसान किक्सची डिलिव्हरी ही लँडमार्क निसानच्या डीलरशीपकडे आजपासून सुरू होईल.
ड्रायव्हिंग पर्सनलायझेशन
ही कार डिझेलमध्ये एक्सएल, एक्सव्ही, एक्सव्ही प्रीमिअम तसेच एक्सव्ही प्रीमिअम प्लस या चार स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर पेट्रोलमध्ये ही कार एक्सएल आणि एक्सव्ही या दोन स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे. नवी निसान किक्स ही ११ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. पर्ल व्हाइट, ब्लेड सिल्व्हर, ब्राँझ ग्रे, फायर रेड, अम्बर ऑरेंज, डीप ब्लू पर्ल, नाइट शेड, फायर रेड आणि ओनिक्स ब्लॅक, ब्राँड ग्रे आणि अम्बर ऑरेंज, पर्ल व्हाइट आणि ओनिक्स ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि अम्बर ऑरेज या रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.
नवी निसान किक्स ही २७ विविध अॅसेसरीजसह वैयक्तिकरण करण्यात आली आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार या सर्व सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत. सर्वात टिकाऊ आणि कस्टम-फिटेड दर्जेदार अॅसेसरीज या एका वर्षाच्या वॉरंटीसह अथवा २० हजार किलोमीटरपर्यंत (जे पहिले येईल ते) उपलब्ध आहेत.