पुणे
ब्रुज ला चॉकलेटेयरने आपले लक्स कलेक्शन पुण्यात नुकतेच सादर केले. मिसेस इंडिया (पहिल्या उपविजेत्या) फराह अन्वर यांच्या हस्ते ब्रुज ला चॉकलेटेयरच्या ढोले पाटील रोडवरील आऊटलेटमध्ये या प्रिमियम कलेक्शनचे उद्घाटन करण्यात आले. बेल्जियम चॉकलेटसची सर्वोत्तम परंपरा राखत आणि ही चॉकलेटस पुणेकरांसाठी उपलब्ध करुन देत लक्सकलेक्शनमध्ये आहेत दर्जेदार घटकांपासून बनलेली हॅण्डक्राफ्टेड चॉकलेट्स.
ब्रुज ला चॉकलेटेयरचे पुण्यातले पहिले दालन सन 2007 मध्ये सुरु झाले आणि आजवर पुण्यातील 10 हजारांहून अधिक चोखंदळ ग्राहकांनी त्यावर आपली पसंतीची मोहोर उमटवली आहे. शब्बीर कानोरेवाला यांनी स्थापन केलेल्या ब्रुज ला चॉकलेटेयरच्या माध्यमातून किमान 50 हून अधिक चॉकेलेटसचे सादरीकरण केले आहे आणि खवय्ये म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांनी या चवीला केंव्हाच मान्यता दिलेली आहे. बेल्जियन संस्कृती, आर्किटेक्चर आणि क्युझिन्सचा योग्य तो सन्मान राखत आणि त्याच परंपरेचे, संस्कृतीला वंदन करत सादर केलेली ही बेल्जियन चॉकलेट्स म्हणजे लक्सकलेक्शनचे अल्ट्रा-फाईन अशी व्हरायटी सादर केली आहे.
लक्सबॉक्स आता पूर्णपणे नव्या पॅकजिंगमध्ये सादर होत असून बोल्ड ब्लॅक आणि फ्ल्युरोसंट ग्रीन या ठाशीव रंगात (सिग्नेचर कलर्स) येत असून चॉकलेट्स सादर करण्याचा हा एक शाही मार्ग आहे. लक्सकलेक्शनच्या एका बॉक्समध्ये 5 फ्लेव्हर्सचे चॉकलेट्स येतात, ज्यांची चव तुमच्या जिभेवरील टेस्टबड्सना जिवंत करते आणि वेगवेगळ्या क्षेत्रानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चव देण्यात येते.
असे आहेत 5 फ्लेव्हर्स…
- रिव्हिएरा रासबेरी – पेरुपासून बनवलेला रिच आणि डार्क कोको, फ्रेंच रासबेरीसह बनते सिनफुल गनाशे
- लेमन हेवन – मेडिटेरानीअन लेमनपासून बनवलेले चॉकलेट, ज्याच्यामध्ये पेरु चॉकलेटचा 65%ब्लेन्ड असतो.
- अरेबियन डिलाईट – मध्यपूर्वेतील अरेबियन कॉफीच्या बियांपासून बनवलेले फ्लेव्हर्स, ज्यामध्ये युगांडा चॉकलेट्सचा 70%ब्लेन्ड असतो आणि ज्यात क्रश केलेल्या कॉफीच्या बिया मिसळलेल्या असतात.
- कॅरॅमेल करेस – अत्यंत चविष्ट अशा सी-सॉल्ट कॅरॅमेल्सला 32%वनौटू दुधात ब्लेन्ड केल्यानंतर मिळणारी चव
- बोर्बॉन रश – 75%बोर्बोन रिच डार्क चॉकलेट आणि फ्रेश व्हॅनिला गनाशेबरोबर ब्लेन्ड केल्यानंतर मिळणारी चव
लक्सच्या कलेक्शनमध्ये दर्जेदार घटक असतात, कुठेही मिळणार नाही, असे फ्लेव्हर्स दिले जातात आणि उत्कृष्ट पॅकिंग दिल्यामुळे खरोखरच एक शाही भेटवस्तू दिल्याचे समाधान ग्राहकाला मिळते. त्यामुळे तुमच्या स्वत:च्या, तुमच्या प्रियजनांच्या आणि व्यावसायिक हितसंबंधियांमध्ये एक आपुलकीचे नाते निर्माण होते.
– शब्बीर कानोरेवाला, ब्रुज संस्थापक
ब्रुज ला चॉकलेटेयरकडून आता असे प्रिमियम चॉकलेट कलेक्शन सादर केले जात आहे, ज्याची तुलना अन्य कोणत्याही चॉकलेटशी होणार नाही; करता येणार नाही. ग्राहकांना हव्या असलेल्या चवीबाबत पाच वर्षे अव्याहतपणे केलेले संशोधन, तसेच विविध प्रकारच्या घटकांचे केलेले फ्युजन यामधून एक अत्यंत परफेक्ट असे चॉकलेट तयार करण्यात आले आहे; आणि अर्थातच हे लक्स कलेक्शनचेच चॉकलेट आहे.
– मुफद्दल कानोरेवाला,ब्रुज संस्थापक