पुणे- काँक्रिटीकरण आणि त्यामुळे जमिनीत न मुरता वाहून जाणारे पाणी ,यावर काही प्रमाणात पुण्यातील सेमेटाईल इंडस्ट्रीज ने स्मार्ट बनू पाहणाऱ्या शहरांना स्मार्ट सोल्युशन दिले आहे . आता पादचारी मार्ग अथवा अन्य ठिकाणचे पेव्हर ब्लॉक जमिनीत पाणी मुरण्यास मदत करतील ..ते तसेच वाहून जावू देणार नाही अशा प्रकारचे स्मार्ट पेव्हर ब्लॉक हडपसरच्या सेमेटाईल कंपनीने बनविले आहेत . आज पुण्यात ते लौंच करण्यात आले . स्मार्ट शहरांना हि स्मार्ट पर्वणी असेल असे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला ओसवाल यांनी सांगितले आणि सर्व महापालिका तसेच मोठ मोठ्या सोसायट्या यांनी याचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी या वेळी केले . सेमेटाइल कंपनीचे संचालक संजय कनाकिया यांनी यावेळी सांगितले कि हे पेव्हर ब्लॉक लावले तर पाणी जमिनीत खाली झिरपेल आणि मुरेल अशा तंत्राने बनविले आहे. या साठी मात्र चौरस फुटला १२ रुपये जास्त म्हणजे ५२ रुपये चौरस फुट असा दर राहील असे ते म्हणाले .