जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रातील किंमतींमध्ये पाच टक्क्यांनी वाढ होईल. परंतु लोकांना देखील विविध प्रकारचे कर भरावे न लागता एकाच प्रकारचा कर भरावा लागणार आहे. यामुळे करप्रणालीला एक दिशा मिळाली असून व्यवहारातही पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. यामुळे साहजिकच लोकांच्या खरेदी क्षमतेतही वाढ अपेक्षित आहे. ही वाढ झाल्यास बाजारात देखील उत्साहपूर्ण वातावरण बघायला मिळेल.
अतुल गोयल, व्यवस्थापकीय संचालक,
गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि.